घरदेश-विदेशबहिणीचे ऑनर कॉलिंग; भावाला मृत्यूदंड

बहिणीचे ऑनर कॉलिंग; भावाला मृत्यूदंड

Subscribe

हरयाणा राज्यात मुली आणि महिला असुरक्षित असल्याच्या अनेक घटना आजवर घडलेल्या आहेत. स्त्रीयांवर अत्याचाराच्या घटनांना जर चाप लावायला असेल तर कायद्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. हिसार जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने एक आदर्शवत उदाहरण निर्माण केले आहे. आपल्या बहिणीचे ऑनर किलिंग करणाऱ्या एका भावाला कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. हिसार जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पंकज यांनी २६ वर्षीय आरोपी अशोक यास ही शिक्षा सुनावली आहे. अशोक हिसारच्या जुगलान गावचा रहिवासी आहे.

आरोपी अशोकने ९ फेब्रुवारी २०१७ रोजी आपल्या बहिणीचा खोट्या प्रतिष्ठेला बळी पडून खून केला होता. आरोपीची बहिण किरण हीने ऑगस्ट २०१५ रोजी सिसवाल गावातील रोहतास सोबत प्रेमविवाह केला होता. रोहतास हा वेगळ्या जातीतील मुलगा असल्यामुळे किरणच्या कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०१७ रोजी तिचा जुगलान गावात सशंयास्पद मृत्यू झाला होता.

- Advertisement -
वाचा – राखीच्या निर्णयानंतर दीपकने दाबला आईचा गळा

जुगलान गावातून तिचा मृतदेह हस्तगत झाल्यानंतर किरण आणि रोहतासच्या लग्नाला मदत करणाऱ्या एका व्यक्तीने हत्येची तक्रार पोलिसांत दाखल केली. किरणचा मृत्यू हा ऑनर किलिंगचा प्रकार असू शकतो? अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यानंतर पोलिसांनी अशोकला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली. भांदवि कायद्यानुसार अशोकवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -