घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : वुहानमध्ये रुग्णालयाच्या संचालकाचा मृत्यू

करोना व्हायरस : वुहानमध्ये रुग्णालयाच्या संचालकाचा मृत्यू

Subscribe

विषाणूचे केंद्रस्थान ठरलेल्या वुहान येथील रुग्णालयाच्या संचालकाचा विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे.

चीनमध्ये धुमाकूळ माजवणार्‍या करोना व्हायरसची धास्ती सध्या जगभरात पसरली आहे. चीनच्या वुहान शहरातून या प्राणघातक विषाणूचा जगात अनेक ठिकाणी फैलाव झाला आहे. आतापर्यंत चीनमध्ये करोना विषाणू कहर केला असून या विषाणूच्या संसर्गामुळे १८०० च्या वर लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर ७०,५४८ पेक्षा जास्त लोकांना त्याची लागण झाली आहे. तसेच या विषाणूचे केंद्रस्थान ठरलेल्या वुहान येथील रुग्णालयाच्या संचालकाचा संसर्गाने मृत्यू झाल्याची माहिती चीन माध्यमांनी दिली आहे. एखाद्या रुग्णालयाचे संचालक करोना विषाणूचे बळी ठरल्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे ही प्रसारित करण्यात आलेली बातमी नंतर हटविण्यात आली आहे.

डॉक्टर, कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास

विषाणूने आतापर्यंत सहा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे बळी घेतले असून, देशातील मृतांची संख्या १ हजार ८६८ वर पोहोचली आहे. याआधी करोना विषाणूबाबत धोक्याचा इशारा देणारे नेत्ररोगतज्ज्ञ ली वेनलिंयांग यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूची बातमीही दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वुहानमध्ये आता मास्क आणि संरक्षक पोशाखाची टंचाई आहे. तसेच अनेक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देखील श्वसनाचा त्रास होत आहे.

- Advertisement -

भारतात औषधांच्या किमती वाढल्या

करोना विषाणूमुळे भारतात पॅरासिटामॉलसह अनेक औषधांच्या किमतीत ४० ते ७० टक्क्यांची वाढ झाली आहे. औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून वेदनाशामक औषधांच्या किमतीत वाढ झाली आहे. झायड्स कॅडीला या फार्मा कंपनीचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या पॅरासिटामॉलची किंमत जवळपास ४० टक्के वाढली आहे. तर अझिथ्रोमायसिन या अँटिबायोटिक्सची किंमत ७० टक्क्यांनी वाढली आहे. येत्या काही दिवसात कच्चा मालाचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर अडचण होऊ शकते. चीनमध्ये कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – करोना विषामुळे भारतात औषधांच्या किमती वाढल्या


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -