घरटेक-वेकTiktok चे स्पष्टीकरण; कोणतीही माहिती परदेशी सरकारला दिली नाही

Tiktok चे स्पष्टीकरण; कोणतीही माहिती परदेशी सरकारला दिली नाही

Subscribe

टिकटॉकवर बंदी घालताच दिली स्पष्टीकरण.

भारत सरकारने एकंदर ५९ अॅप्स ब्लॉक करण्यासंदर्भात अंतरिम आदेश जारी केला असून यात टिकटॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत. आम्हाला याबाबत सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठकीचे निमंत्रण आले असून या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची आणि स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार आहे.

डेटा प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटीबाबतच्या सर्व भारतीय अधिनियमांचे टिकटॉक काटेकोरपणे पालन करत असून आमच्या भारतातील वापरकर्त्यांची कोणतीही माहिती आम्ही कोणत्याही परदेशी सरकारला दिलेली नाही, चिनी सरकारलाही नाही. भविष्यात आमच्याकडे अशी मागणी करण्यात आली. तरीही आम्ही अशी माहिती कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. आमच्या दृष्टीने वापरकर्त्यांची गोपनीयता आणि अखंडता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

- Advertisement -

टिकटॉकने १४ भारतीय भाषांमध्ये सेवा देत इंटरनेटमध्ये लोकशाहीच आणली आहे. यात कोट्यवधी सामान्य वापरकर्ते, कलाकार, गोष्टी सांगणारे, शिक्षणक्षेत्रातील मंडळी आणि टिकटॉकच्या माध्यमातून उदरनिर्वाह चालवणाऱ्या असंख्य लोकांचा समावेश आहे. यातले अनेकजण तर पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर करणारेही आहेत.  – निखिल गांधी, टिकटॉक इंडियाचे प्रमुख


हेही वाचा – टीक-टॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर भारताची बंदी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -