Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'भाजपच्या लसीवर कसा ठेवणार विश्वास?'

‘भाजपच्या लसीवर कसा ठेवणार विश्वास?’

'भाजपच्या लसीवर विश्वास कसा ठेवणार'?, असा प्रश्न उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे.

Related Story

- Advertisement -

देशभरात लवकरच कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे देशातील अनेक राज्यात ड्राय रनला सुरुवात झाली आहे. मात्र, असे असले तरी ‘भाजपच्या लसीवर विश्वास कसा ठेवणार’?, असा प्रश्न उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले अखिलेश यादव?

- Advertisement -

‘मी कोरोनाची लस घेणार नाही. कारण भाजप ही लस देणार आहे. त्यांच्यावर मी कसा विश्वास ठेऊ. आपलं सरकार येईल तेव्हा सगळ्यांना मोफत लस देऊ. त्यामुळे आम्ही भाजपची लस घेऊ शकत नाही’, असे अखिलेश यांनी म्हटलं आहे.

नववर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोना संदर्भात सरकार देशवासियांना दिलासा देणारे निर्णय घेत आहे. शुक्रवारी पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूट आणि ऑक्सफर्डमार्फत तयार करण्यात आलेल्या लसीला पहिल्या टप्प्यात परवानगी मिळाली आहे. तसेच आजपासून देशभरात लसीकरणाच्या ड्राय रनला देखील सुरुवात झाली आहे. आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देखील कोरोना संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे. आता दिल्लीतच नव्हे, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत मिळणार असल्याचं हर्ष वर्धन यांनी जाहीर केलं आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात १ कोटी हेल्थकेअर वर्करला कोरोनाची वस दिली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्करला लस दिली जाणार असून त्यानंतर इतर २७ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.


हेही वाचा – मुंबईच्या २६/११चा मास्टरमाईंड झाकीर रहिमन लखवीला बेड्या


- Advertisement -