घरटेक-वेकSamsung ला मागे टाकत 'ही' कंपनी बनली सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी!

Samsung ला मागे टाकत ‘ही’ कंपनी बनली सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी!

Subscribe

एप्रिल ते जून या कालावधीत Huawei ची शिपमेंट ५५ मिलियन तर Samsung ने केवळ ५१ मिलियन हँडसेटची विक्री

चीनी कंपनी Huawei आणि Samsung काही वर्षांपासून एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी स्पर्धा करत आहेत. मात्र सध्या स्मार्टफोन व्यवसायाबद्दल एक किंवा दोन वर्षे Huawei ची वाईट स्थिती असून बऱ्याच देशांमध्ये ती चांगली नाही. अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही Huawei वर काही काळ बंदी घालण्यात आली आहे. कॅनडापासून भारतापर्यंत या कंपनीत बर्‍याच अडचणी येत आहेत. दरम्यान, अमेरिकेचा आरोप आहे की, ही कंपनी चीन सरकारबरोबर डेटा शेअर करते.

Samsung च्या तुलनेत Huawei चे नुकसान कमी

तर स्मार्टफोन बाजारपेठेतून Huawei साठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण Samsung ची जागा घेऊन ही कंपनी नंबर -१ स्मार्टफोन कंपनी बनली आहे. म्हणजेच Huawei सध्या जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी ठरत आहे.  कोविड -१९ च्या दरम्यान जगभरातील लॉकडाऊनचा परिणाम Samsung च्या उत्पादन, निकालावर झाला आहे. असा विश्वास आहे की, एप्रिल ते जून या काळात Samsung मध्ये ३० % घट झाली आहे. पण Huawei ची स्थिती वेगळी दिसत असून Samsung च्या तुलनेत Huawei चे नुकसान कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

Samsung दुसऱ्या स्थानी

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, काही चिनी माध्यमांनी दिलेल्या अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, Huawei या तीन महिन्यात प्रथमच जगातील नंबर १ ची स्मार्टफोन निर्माता कंपनी बनली आहे. गिझमो चायनाच्या एका वृत्तानुसार, मे महिन्यात ८१.९ मिलियन स्मार्टफोन पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी Huawei चे बाजारपेठेतील शेअर १९.७ तर Samsung १९.८% सह दुसर्‍या क्रमांकावर आहे.

एप्रिलमध्येही Huawei मार्केट शेअर बाबतीत Samsung ला मागे टाकले आहे. कारण या काळात Huawei चा बाजारातील हिस्सा २१.४% होता, तर Samsung चा हिस्सा १९.८% होता. अहवालानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत Huawei ची शिपमेंट ५५ मिलियन तर Samsung ने केवळ ५१ मिलियन हँडसेटची विक्री झाली आहे.


भारतीय सैन्याने FB, TikTok सह ८९ Apps वर घातली बंदी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -