घरटेक-वेक२१ जूनला मोठा सायबर हल्ला होण्याचा धोका?

२१ जूनला मोठा सायबर हल्ला होण्याचा धोका?

Subscribe

जिथे भारतात एकीकडे २१ जूनच्या सूर्यग्रहणाची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे २१ जून रोजीच देशात मोठा सायबर अटॅक होण्याची शक्यता असल्याचं वृत्त ZDNet च्या हवाल्याने नवभारत टाईम्सने दिलं आहे. कोरोनाच्या काळात सायबर हल्ले होण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलं आहे. ऑनलाईन खरेदी-विक्री किंवा एटीएम-क्रेडिट कार्डच्या सीव्हीव्ही क्रमांकांची चोरी करून त्यातून ऑनलाईन गंडा घातल्याच्या घटना देखील गेल्या काही काळात वाढल्या आहेत. त्यातच आता २१ जून रोजी हा सायबर हल्ला होण्याची भिती वर्तवली जात असून यामध्ये प्रामुख्याने जगातले ६ देश टार्गेटवर आहेत. त्यात भारताचा देखील समावेश आहे.

लझारस ग्रुप नावाचा एक हॅकर्सचा गट हा सायबर हल्ला करण्याच्या तयारीत असून त्यातून मोठा पैसा कमावण्याची त्यांची योजना असल्याचं देखील या वृत्तात म्हटलं आहे. भारतासोबतच सिंगापूर, द. कोरिया, जपान, अमेरिका आणि ब्रिटन या हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. या देशांमधल्या अनेक कंपन्या छोटे-मोठे उद्योग आणि वैयक्तिक इमेल या गटाकडे आहेत. या इमेलवर अनोळखी नावावरून मेल पाठवून त्यातून तुम्हाला दुसऱ्या एका वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगितलं जाईल. आणि त्यातून तुमची वैयक्तिक आणि बँक अकाऊंटसंबंधीची माहिती मिळवली जाईल, असं सांगितलं जात आहे. एका माहितीनुसार या गटाकडे ५० लाखांहून जास्त अशा इमेल अकाऊंट्सची माहिती आहे.

- Advertisement -

लझारस हॅकर्सचा असा दावा आहे की त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ५० लाख इमेल अकाऊंट्सच्या माहितीपैकी ११ लाख जपानी, २० लाख भारतीय आणि १ लाख ८० हजार ब्रिटिश इमेल्स आहेत. दरम्यान, ही बाब समोर येताच सतर्कतेचा उपाय म्हणून त्या त्या देशांमधल्या प्रशासनाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -