घरदेश-विदेशशंभर शास्त्रज्ञांचा दावा; हवेमार्फत पसरतो कोरोना! WHO कडे संशोधनाची मागणी

शंभर शास्त्रज्ञांचा दावा; हवेमार्फत पसरतो कोरोना! WHO कडे संशोधनाची मागणी

Subscribe

डब्ल्यूएचओकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची होतेय मागणी

चीनमधून जगभर पसरलेला कोरोना व्हायरसचा गेल्या काही दिवसांपुर्वी एक खुलासा करण्यात आला होता. ज्यामुळे या व्हायरसची तीव्रता प्रकर्षणाने जाणवू शकते. करोना विषाणू आता सूक्ष्म हवेमध्ये मिसळून हवेच्या माध्यमातून दुसर्‍या व्यक्तीस हा रोग संक्रमित करीत आहे, असा दावा शांघायमधील अधिकार्‍यांनी केला होता. यानंतर जगभरातील शेकडो शास्त्रज्ञांनी देखील कोरोना व्हायरस हवेतून पसरून इतरांना संक्रमित करू शकतो, असा दावा केला आहे.

तुम्ही असा विचार करत असाल की, आपण गर्दीच्या ठिकाणी जात नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात नाही, त्यामुळे तुम्ही मास्क शिवाय फिरत असाल तर सावधान… जगभरातील अशा शंभर शास्त्रज्ञांनी त्याच्या संशोधनातून हे सिद्ध केले आहे की, कोरोना व्हायरस एअरबोर्न म्हणजेच हवेच्या माध्यमातून पसरतो. दरम्यान ३२ देशातील २३९ शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाद्वारे सांगितले की, जीवघेण्या कोरोना व्हायरसचे लहान-लहान कण हवेत जीवंत राहतात आणि ते लोकांना संक्रमित करू शकतात.

- Advertisement -

यापूर्वी, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हेवेमार्फत विषाणूचा प्रसार होतो याबद्दल स्पष्टीकरण देताना असे सांगितले होते की व्हायरसचे संक्रमण हवेच्या माध्यमातून पसरत नाही. त्यानंतर डब्ल्यूएचओने स्पष्ट केले की, हा धोकादायक विषाणू केवळ थुंकीच्या कणांद्वारे पसरतो. हे कण कफ, शिंका येणे आणि बोलण्यातून शरीराबाहेर पडतात. तर थुंकीचे कण इतके हलके नाहीत की ते वाऱ्यासह उडून हेवत पसरू शकतात. मात्र ते शरिरातून बाहेर पडल्यावर थेट जमिनीवर पडतात.

मात्र न्यूयॉर्क टाईम्सने नुकताच सादर केलेल्या अहवालानुसार शास्त्रज्ञांचा नवा दावा आता काही वेगळंच सांगत आहे. त्यानुसार, शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओला या नव्या दाव्याबद्दल संशोधन करून विषाणूच्या शिफारशींमध्ये त्वरित सुधारणा करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार आता डब्ल्यूएचओकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान कोरोनाचा कहर दिवसेंदिवस जगभरात वाढत आहे. आतापर्यंत, जगभरात १ कोटी १५ लाख ४४ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर ५ लाख ३६ हजारांहून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. अशा परिस्थितीत जर हा विषाणू हवे मार्फत पसरत असल्याचा दावा खरा असेल तर लोकांच्या चिंतेत अधिक वाढ होईल, हे मात्र नक्की…


व्हायरस चीनची पाठ सोडेना! कोरोनानंतर ‘या’ नव्या व्हायरसची एन्ट्री!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -