घरदेश-विदेशनवरोबांनो बायकोचे ATM वापरता? मग हे वाचाच

नवरोबांनो बायकोचे ATM वापरता? मग हे वाचाच

Subscribe

पतीला पत्नीचे एटीएम वापरता येणार नाही असा निर्णय बंगळुरूतल्या न्यायालयाने दिला. वंदना आणि राजेश दाम्पत्याने बँकेच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले होते. त्यानंतर न्यायालयाने निकाल देत पतीला पत्नीचे ATM वापरता येणार नाही असा निकाल दिला. यावेळी बँकेने देखील पिन हस्तांतरण करता येणार नाही या निमयावर कोर्टात युक्तीवाद केला.

जास्त पैसे सोबत ठेवण्यापेक्षा आता प्रत्येक जण एटीएम वापरणे पसंत करतो. स्वत:ला वेळ नसेल तर आपण आपल्या जवळच्या, विश्वासू व्यक्तीजवळ एटीएम देऊन पैसे काढायला सांगतो. बऱ्याच वेळा नवरा-बायकोसुद्धा एकमेकांचे एटीएम वापरतात. पण, आता थांबा! आता नवऱ्याला देखील बायकोचे एटीएम वापरता येणार नाही. बंगळुरूतल्या न्यायालयाने तसा निकाल दिला आहे. त्यामुळे तुम्ही जर बायकोचे एटीएम वापरत असाल तर थोडी काळजी घ्या!

काय आहे प्रकरण?

बंगळूरू येथे रहात असलेल्या वंदना आणि राजेश या दाम्पत्याला न्यायालयाने दणका दिला आहे. वंदना प्रसुती रजेवर असल्यामुळे त्यांनी पती राजेश यांच्याकडे एटीएम कार्ड देऊन पैसे काढून आणायला सांगितले. पण, एटीएममधून पैसेच आले नाहीत. उलटपक्षी वंदना यांच्या मोबाईलवर पैसे डेबिट झाल्याचा मेसेज गेला. त्यानंतर वंदना यांनी बँकेच्या ग्राहक केंद्राकडे तक्रार केली. त्यावेळी तुमचे पैसे २४ तासाच्या आत अकाऊंटला जमा होतील असे सांगितले. पण पैसे परत न मिळाल्यानं वंदना आणि राजेश यांनी बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.

- Advertisement -

वरीष्ठ बँक अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवत ‘कार्डच्या पिनचं हस्तांतरण करता येत नाही’ असे सांगतिले. त्यावर आपण गरोदर असल्यामुळे एटीएममध्ये जाणे शक्य नसल्याचे वंदना यांनी सांगितले. त्यानंतर देखील बँकेने त्यांचे म्हणणे फेटाळून लावले. अखेर, ऑक्टोबर २०१४मध्ये प्रकरण न्यायालयात पोहोचले.

न्यायालयात देखील वंदना यांनी गरोदर असल्याने एटीएममध्ये जाऊ शकत नसल्याचे सांगितले. पण, त्याचा देखील काही फायदा झाला नाही. त्यानंतर माहिती अधिकारांतर्गत एटीएममधील रोकडची माहिती या दाम्पत्याने मिळवली. त्यावेळी एटीएममध्ये २५ हजार जास्त असल्याची माहिती समोर आली. शिवाय सीसीटीव्ही फुटेज देखील न्यायालयात सादर केले. पण, न्यायालयाने देखील बँकेच्या निमयावर बोट ठेवत, डेबिट कार्ड ऐवजी सेल्फ चेक का नाही दिला? असा सवाल केला. शिवाय महिलेची याचिका देखील फेटाळून लावली.

- Advertisement -

दुसऱ्याला ATM पिन सांगताना खबरदारी घ्या!

बऱ्याच वेळा आपण विश्वासातल्या व्यक्तीला पिन सांगून पेैसे आणायला सांगतो. पण, कधी कधी नेटवर्कच्या समस्येमुळे एटीएममधून पैसे देखील येत नाहीत. त्यावेळी पैसे २४ तासात तुमच्या खात्यावर जमा होतील असा मेसेज बँकेकडून येतो. पण, आता तुम्ही देखील खबरदारीचा उपाय घ्या. विश्वासातल्या व्यक्तीशी पिन नंबर शेअर करताना बँकेचे नियम वाचा. अन्यथा वंदना आणि राजेश दाम्पत्यासारखी वेळ तुमच्यावर देखील येईल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -