घरदेश-विदेशनागपूरचा पती आणि युएसच्या पत्नीने घेतला व्हाट्सअॅपवरून घटस्फोट

नागपूरचा पती आणि युएसच्या पत्नीने घेतला व्हाट्सअॅपवरून घटस्फोट

Subscribe

पती नागपूर आणि पत्नी युएसला असल्यामुळे अखेर व्हिडिओ कॉलिंगच्या साहाय्याने घटस्फोट देण्याचा निर्णय नागपूर कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे.

आजपर्यंत न्यायालयात घटस्फोटाचे अनेक खटले आपण ऐकले असतील. मात्र नागपूर कौटुंबिक न्यायालयात एक वेगळ्याच पद्धतीने घटस्फोट घेण्यात आला आहे. घटस्फोट घेणारा पती हा नागपूर येथील रहिवाशी आहे. मागील काही महिन्यांपासून त्याची ३५ वर्षीय पत्नी युनायटेड स्टेट (युएस) मध्ये शिक्षण घेत आहे. सुट्ट्या नसल्याने ती न्यायलयामध्ये येऊ शकत नव्हती. अखेर न्यायाधिशांनी फोनवरूनच त्यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली. दोघांनी संगनमताने घटस्फोट घेतला आहे. या महिलेचा ३७ वर्षीय पती हा नागपूरमध्ये राहातो. येथेच एका खाजगी कंपनीत तो कामाला आहे.

दहा लाख पोटगी भरून घटस्फोटाला दिली मान्यता

या दोघांचे लग्न ११ ऑगस्ट २०१३ रोजी झाले होते. हे पती पत्नी अभियंता म्हणून खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. मागील काही महिन्यांपासून या दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. पत्नी दूर असल्यामुळे या दोघांनी घटस्फोट घ्यायचे ठरवले. यानुसार त्यांनी नागपूर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने १० लाखाच्या पोटगी भरून घटस्फोटाला मान्यता दिली आहे. न्यायालयाचा हा निर्णय या दाम्पत्याने मान्य केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -