हैदराबाद एन्काऊंटरची एसआयटीमार्फत होणार चौकशी

Hyderabad
hyderabad encounter telangana government appointed SIT
हैदराबाद एन्काऊंटरची एसआयटीमार्फत होणार चौकशी

हैदराबाद येथे २६ वर्षीय एका महिला डॉक्टरवर चार नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार करुन तिची निघृणपणे हत्या केली. या चारही नराधमांना पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एन्काऊंटर करुन ठार मारले. मात्र, पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटवर काही जनसामान्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही लोकांकडून तेलंगणा पोलिसांवर टीका होत आहे. पोलिसांनी केलेली ही कारवाई कायद्याला धरुन नव्हती, असे बोलले जात आहे. याशिवाय घटनेप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने देखील चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता तेलंगणा सरकारने हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश एम. भागवत हे या पथकाचे प्रमुख आहेत.


हेही वाचा – हैदराबाद एन्काऊंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका


आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबरपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे कोर्टाचे आदेश

पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरच्या विरोधात तेलंगणा हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टाने आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबर रात्री ९ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तेलंगणा सरकारने विशेष पथक स्थापन केले आहे. हे पथक पोलिसांची सविस्तर चौकशी करणार आहे. त्याचबरोबर एन्काऊंटरबाबत साक्षीदार कोण आहेत हे पाहणार असून साक्षीदाराचा जबाब नोंदवणार आहे.


हेही वाचा – हैदराबाद बलात्कार प्रकरण : असा झाला एन्काऊंटर


हैदराबाद पोलिसांनी काय माहिती दिली होती?

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील मुख्य चार आरोपींचा शुक्रवारी एन्काऊंटर करण्यात आला असून या एन्काऊंटरमध्ये चारही आरोपींना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘या चार आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले. दरम्यान, त्यांच्याकडून तपास सुरु असताना चारही आरोपींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रचंड प्रयत्न केला. मात्र, तरीही ते पोलिसांच्या हातून निसटले आणि पळत सुटले, त्यामुळे त्यांना ठार करण्यात आले आहे’, अशी माहिती हैदराबाद पोलिसांकडून देण्यात आली होती.


हेही वाचा – हैदराबाद बलात्कार प्रकरण: चारही आरोपींचे एन्काऊंटर