घरदेश-विदेशपतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पत्नीनं इंजिनिअर जावयाला जिवंत जाळलं

पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पत्नीनं इंजिनिअर जावयाला जिवंत जाळलं

Subscribe

हैदराबाद येथे वास्तव्यास असणारा पवन कुमार हा इंजिनिअर असून त्याला खुर्चीवर बांधण्यात आले आणि त्याला जिवंत जाळले

देवावर तसेच विज्ञानावर विश्वास न ठेवता कित्येकदा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन त्याला बळी पडल्याच्या अनेक घटना आपल्या समोर आहे. आजच्या २१ व्या शतकात देखील जादूटोणा, अंधश्रद्धा यावर विश्वास ठेऊन तेलंगणातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेलंगणातील बळवंत नगर जिल्ह्यातील जगतीलाल गावात जादूटोणा केला असल्याच्या संशयावरून एकाला जिवंत जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

असा घडला प्रकार

हैदराबाद येथे वास्तव्यास असणारा पवन कुमार हा इंजिनिअर असून त्याला खुर्चीवर बांधण्यात आले आणि त्याला जिवंत जाळले. पवन कुमारला त्याचा चुलत भाऊ जगनच्या घरी खोटं सांगून घेऊन जाण्यात आले, त्यानंतर हा सर्व प्रकार घडला. पवन कुमार बंगळुरूतील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात जगनची पत्नी आणि भावाला अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये परस्पर पवनने काही महिन्यांपूर्वी जगनला जिवे मारण्याची धमकी दिली होती. यापूर्वी १२ दिवसांपूर्वी जगनचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान पवननेच जादूटोणा करून जगनला मारले असल्याचा त्याच्या पत्नीचा संशय होता. याचाच बदला घेण्यासाठी जगनच्या पत्नीने पवनला घरी बोलावले. त्यानंतर कुटुंबियांचं सांत्वन करण्याच्या उद्देशानं पवन जगनच्या घरी गेल्यानंतर त्याला मंदिरात घेऊन गेले. जगनच्या पत्नीनं त्याला खुर्चीवर बांधले, पवनला जिवंत जाळण्यात आले.

स्थानिकांना संध्याकाळच्या वेळी आरडा-ओरडा करण्याचा आवाज आला. त्यानंतर हा मंदिरातील आवाज ऐकून मंदिराचे दार उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पवनचा मृतदेह खुर्चीवर जाळलेल्या अवस्थेत आढळला.


अहमद पटेल यांचा गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेसचे ‘चाणक्य’ पर्यंतचा प्रवास
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -