घरदेश-विदेशतरुणीच्या मदतीचा आवाजच बंद!

तरुणीच्या मदतीचा आवाजच बंद!

Subscribe

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण

हैदराबादमध्ये पशुवैद्यक महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला निर्घृणपणे जाळणार्‍या चौघा नराधमांना शुक्रवारी अटक करण्यात आली असून त्यांची नावे मोहम्मद, आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी आहेत. पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर तिचा आवाज येऊ नये, म्हणून तिचे तिचे नाक तोंड दाबले त्यात तिचा मृत्यू झाला, अशी धक्कादायक माहिती आरोपींच्या जबानीतून उघड झाली आहे.

पीडित तरूणीवर झालेला अत्याचाराचा घटनाक्रम पोलिसांनी आरोपींकडून वदवून घेतला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान या तरुणीवर अत्याचार झाला. प्रियांका बुधवारी रात्री दवाखान्यातून घरी परतत असताना तिची दुचाकी अचानक बंद पडली. त्यावेळेस तिने बहिणीला कॉल करुन दुचाकी बंद झाली असल्याचे सांगितले. आपल्याला या ठिकाणी खूप भीती वाटत असल्याचेही तिने आपल्या बहिणीला फोनवरुन सांगितले. पण, त्यानंतर प्रियांकांचा फोन बंद झाला. आरोपींना अटक केल्यानंतर चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचून तिच्या स्कुटीची हवा काढली होती. सीसीटीव्ही आणि लोकांकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

बुधवारी संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचे पाहिले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता चाक पंक्चर झाले असल्याचे तिने पाहिले. आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. तू पाहून प्रियांका चिंतीत झाली. यावेळी मोहम्मद आरिफ मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर शिवा स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत काही अंतर दूर घेऊन गेला. यानंतर या तरुणीला जबरदस्तीने निर्जनस्थळी नेण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. सामूहिक बलात्कारावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

आरोपींना यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली. याचवेळी आरोपी मोहम्मद आरिफ याने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी या तरुणीचे तोंड दाबून ठेवले. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन तिचा मृत्यू झाला. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केले. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या टाकून पेटवून दिला,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

देशभरात संताप आणि आंदोलन
पीडित डॉ. प्रियांका रेड्डी बलात्काराप्रकरणी संपूर्ण देशातून निषेध, आंदोलने केली जात आहेत. प्रियांकाला न्याय मिळावा अशी मागणी करत दिल्लीतील संसदेच्या बाहेर अनु दुबे ही तरुणी आंदोलनाला बसली आहे. आंदोलन करत असताना अनुला महिला पोलिसांकडून मारहाणदेखील केली गेली आहे. प्रियांकावर केलेल्या सामूहिक बलात्काराप्रकरणी आणि त्यानंतर तिला जिवंत जाळल्याप्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय, प्रियांकावर झालेल्या बलात्कारामुळे महिलांच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गृहमंत्र्यांची मुक्ताफळे
देशभरात या घटनेवरून संताप व्यक्त होत असताना तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद मेहमूद अली यांनी पीडित तरुणीलाच दोषी ठरवले आहे. तरुणी इतकी सुशिक्षित होती तर मग फोन पोलिसांना करण्याऐवजी बहिणीला कशाला केला? असा उलट प्रश्न त्यांनी केला आहे. बहिणीला फोन करण्याऐवजी तिने पोलिसांना फोन केला असता तर कदाचित तिला वाचवता आले असते, अशी मुक्ताफळे अली यांनी उधळली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -