घरदेश-विदेशचोरांशी ज्वेलर्सने केले दोन हात

चोरांशी ज्वेलर्सने केले दोन हात

Subscribe

हैद्गाबादमधील ३२ वर्षीय ज्वेलर्सने चोराशी १० मिनिटे दोन हात केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पण, ज्वेलर्स मालकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत अखेर चोरांनी आपला डाव साधला.

हैद्राबादमधील एका ज्वलर्सच्या दुकानात बुधवारी गिऱ्हाईक बनून चोर ज्वेलर्सच्या दुकानात शिरले आणि त्यांनी दुकान लुटीचा डाव मांडला. पण, ज्वेलर्सने त्यांच्याशी दोन हात करत त्यांना चोरीपासून रोखण्याचा प्रयत्न केला. जवळपास दहा मिनिटे ही झटापटी सुरू होती आणि हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चोरांनी जवळपास २५ लाखांचे सोने आणि ४ लाखांची रोकड घेऊन पोबारा केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

…अन् ज्वलर्सने केले चोरांशी दोन हात

बुधवारी सकाळी हैद्राबादमधील ३२ वर्षीय जयराम यांनी ९ वाजता दुकान उघडले. त्यानंतर गिऱ्हाईक बनून दोन चोरांनी दुकानात प्रवेश केला. जवळपास ४५ मिनिटे या दोघांनी दुकानामध्ये विविध प्रकराचे दागिने पाहिले आणि खरेदीसाठी आणखी काही दागिने दाखवण्याची विनंती केली. जयराम यांना या दोघांचा धूर्तपणा लक्षात नाही आला. आणखी काही दागिन्यांच्या डिझाईन्स दाखवण्यासाठी जयराम स्टोअर रूममध्ये गेले. त्यानंतर या दोघांनी देखील जयराम यांच्या पाठोपाठ स्टोअर रूममध्ये प्रवेश करत बंदुकीचा धाक दाखवत सर्व दागिन्यांची मागणी केली. पण, प्रसंगावधान दाखवत जयराम यांनी या चोरांना विरोध केला. यावेळी चोर आणि जयराम यांच्यामध्ये जवळपास १० मिनिटे ही झडापटी झाली. यावेळी चोर महिला जयराम यांना मारताना देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. जयराम यांचा प्रतिकार वाढत होता. आता आपली काही डाळ शिजत नाही हे लक्षात येताच चोरांनी जयराम यांच्या डोळ्यात मिरचीच पावडर फेकली. डोळ्यात मिरचीच पावडर गेल्याने जयराम यांना काही दिसेनासे झाली. प्रतिकार करणे देखील कठिण झाले. हीच संधी साधत चोरट्यांनी दुकानातील तब्बल २५ लाखांचे दागिने आणि ४ लाखांची रोकड घेत पोबरा केला. हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यावेळी चोरांच्या हातात असलेली बंदुक ही खेळण्यातील असल्याचे लक्षात आले. अद्यापही चोरांची ही जोडी कोण याचा शोध लागला नसून सीसीटीव्ही पोलिसांनी सर्व पोलीस स्टेशनला पाठवून दिले आहे. दरम्यान, जयराम यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरांपैकी एक चोर जखमी असल्याने चोरीचा शोध लवकर लागू शकेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण जयराम यांनी केलेल्या प्रतिकाराची चर्चा सध्या हैद्राबादमध्ये ऐकायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -