घरताज्या घडामोडी'ज्या' व्यक्तीवर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले 'तो' दोन दिवसांनी दारात हजर झाला आणि...

‘ज्या’ व्यक्तीवर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले ‘तो’ दोन दिवसांनी दारात हजर झाला आणि…

Subscribe

कानपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. ज्या व्यक्तीवर दोन दिवसांपूर्वी कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले तो व्यक्ती अचानक घरी आला. एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. कुटुंबियांनी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. पण तो व्यक्ती अचानक दिवसांनी घरी परतला. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.

चाकेरी पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. २ ऑगस्टला अहमद हसन नामक व्यक्तीचे आपल्या पत्नीबरोबर भांडण झाले आणि तो घरातून बाहेर पडला. अहमद घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांनी तो हरवल्याची तक्रार पोलिसात केली. अखेर ५ ऑगस्टला पोलिसांना हसनचा मृतदेह सापडला. तो मृतदेह हसनचा असल्याची खात्री झाल्यावरच पोलिसांनी तो कुटुंबियांच्या हवाली केला. कुटुंबियांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. पण अचानक दोन दिवसांनी हसन दारात हजर झाला. हसनला दारात बघताच कुटुंबियांना धक्काच बसला.

- Advertisement -

“माझ्या पत्नीबरोबर शाब्दिक चकमक झाल्यामुळे मी घर सोडले. वाटेत एका व्यक्तीने मला मदत केली आणि मी एका कारखान्यात काम केले. माझ्या कामाचे पैसे दिल्यानंतर शुक्रवारी मी घरी परतलो. “परंतु माझ्या शेजार्‍यांनी मला ओळखले. त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले आणि त्यांनी मला पोलीस ठाण्यात आणले. घरी परत आल्यावर मला समजले की मला मृत घोषित करण्यात आले आहे.’

तर हसन घरी परत आल्यामुळे त्याची बायको नगमा खूप आनंदी आहे. ती म्हणाली, क्षुल्लक कारणावरून आमच्यात वाद झाला होता. त्याला राग आला आणि तो घराबाहेर गेला. दोन दिवस घरी परत न आल्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आम्हाला एक मृतदेह दाखवला. सुरूवातीला मला शंका होती पण त्यांच्या भावांनी तो हसन असल्याचे सांगितले. पण आता माझा  नवरा परत आला आहे. याचा मला आनंद आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, पुढचे ३ दिवस महत्त्वाचे!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -