घरताज्या घडामोडी‘तब्येत अगदी ठणठणीत; सेल्फ आयसोलेशनमध्ये नाही’: राज्यपाल कोश्यारी

‘तब्येत अगदी ठणठणीत; सेल्फ आयसोलेशनमध्ये नाही’: राज्यपाल कोश्यारी

Subscribe

राज्यपाल कोश्यारी यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.
‘आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात (सेल्फ आयसोलेशन) नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिति पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. या संदर्भात आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे, असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

तसेच, राजभवनातील एका इलेक्ट्रिशियनला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर राजभनवातील तब्बल १०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर इतरांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रकृती स्थिर असून ते सेल्फ आयसोलेशनमध्ये असल्याचे समोर आले होते. मात्र यावर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.


राजभवनात कोरोनाचा शिरकाव; १८ जणांना कोरोनाची लागण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -