घरदेश-विदेशमोहम्मद आसीफच्या गोलंदाजीवर ए बी डिविलिअर्सला ढसाढसा रडताना पाहिलय - शोएब अख्तर

मोहम्मद आसीफच्या गोलंदाजीवर ए बी डिविलिअर्सला ढसाढसा रडताना पाहिलय – शोएब अख्तर

Subscribe

पाकिस्तान जलदगती गोलंदाज रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असणारा शोएब अख्तर हा आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता पाकिस्तानच्याच वेगवान गोलंदाज मोहम्मद आसीफचे तोंडभरून कौतुक शोएबने केले आहे. मोहम्मद आसीफच्या गोलंदाजीवर खेळताना दिग्गज फलंदाजांची कशी घाबरगुंडी उडायची याची आठवण त्याने सांगितली आहे. ए बी डिविलर्स मोहम्मद आसीफच्या गोलंदाजीचा सामना करताना कसा ढसाढसा रडला होता याबाबतची आठवण मोहम्मद आसीफने शेअर केली आहे. मोहम्मद आसीफ हा ऑल टाईम स्मार्टेस्ट फास्ट बॉलर होता असे कौतुक शोएबने केले आहे.

ए बी डिविलिअर्सला मोहम्मद आसीफच्या गोलंदाजीला खेळताना धडकी भरायची. अनेकदा तो अडचणीत आल्याचे पहायला मिळाले आहे. एकदा तर डिविलिअर्स चक्क रडकुंडीला येऊन ढसाढस रडला होता अशी आठवण शोएबने सांगितली.एशियन चॅम्पिअनशीपमध्ये डिविलिअर्स रडताना मी पाहिले आहे. तर मी या बॉलरला कसा खेळू असा सवाल करत ? व्ही व्ही एस लक्ष्मणचीही घाबरगुंडी उडायची असे शोएबने सांगितले. वसीम अक्रमपेक्षाही उच्च दर्जाची गोलंदाजी ही मोहम्मद आसीफने करताना मी पाहिलेल आहे.

- Advertisement -

मोहम्मद आसीफला स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात २०१० मध्ये आयसीसीने क्रिकेट खेळण्यापासून बॅन केले होते. इंग्लंडमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणात ही कारवाई आसीफवर करण्यात आली होती. मोहम्मद आसीफने शोएब अख्तरच्या जोडीने एकेकाळी पाकिस्तानी संघासाठी गोलंदाजी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -