घरदेश-विदेशहॉक जेट उडवणाऱ्या मोहना सिंह ठरल्या पहिल्या भारतीय महिला पायलट

हॉक जेट उडवणाऱ्या मोहना सिंह ठरल्या पहिल्या भारतीय महिला पायलट

Subscribe

लेफ्टनंट मोहना सिंह यांनी हॉक अडवान्स जेट विमान उडवून एक अनोखा विक्रम रचला आहे. हॉक विमान घेऊन दिवसा मिशन पुर्ण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला पायलट ठरल्या आहेत. पश्चिम बंगालच्या कलाईकुंडा एअरफोर्ट स्थानकातून मोहन सिंह यांनी हॉक जेटचे उड़्डान आणि लँडिग दोन्ही यशस्वीरित्या करुन दाखवले. २०१६ साली मोहना सिंह यांच्यासोबत भावना कांत आणि अवनी चुतर्वेदी यांची लढाऊ विमान पायलटच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती.

- Advertisement -

मोहना सिंह यांच्या प्रशिक्षणात हवेतल्या हवेत युद्ध आणि हवेतून जमिनीवर मारा असा मिशनचा समावेश आहे. सिंह यांनी अनेक प्रकारचे मिशन पुर्ण केले आहेत. ज्यामध्ये रॉकेट लाँचिंग, बंदूक आणि उच्च क्षमतेचे बॉम्ब पाडण्याचे प्रशिक्षण सामील आहे. तसेच वायूसेनेच्या विभिन्न स्तरावर उड्डान घेण्याचाही त्यांनी अभ्यास केला आहे.

याआधी भावना कांत यांनी युद्धात सहभागी होण्याची पात्रता मिळवली होती, अशी पात्रता मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. २२ मे रोजी वायू सेनेने भावना कंठ यांनी मिग २१ लढाऊ विमान उडवल्याचे सांगितले होते. वायूसेनेचे प्रवक्ते ग्रुप कॅप्टन अनुपम बॅनर्जी यांनी सांगितले होते की, भावना कंठ यांनी दिवसा मिग २१ विमान उडवून आपले मिशन पुर्ण केले होते, असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला पायलट ठरल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -