घरदेश-विदेशअभिनंदन मायदेशी परतला हादेखील मोदी यांचा पराक्रम; स्मृती इराणीचा 'नमो' जप!

अभिनंदन मायदेशी परतला हादेखील मोदी यांचा पराक्रम; स्मृती इराणीचा ‘नमो’ जप!

Subscribe

भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचे संपूर्ण श्रेय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली. पंजाब येथील वाघा बॉर्डरवर अभिनंदन यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली सुखरूप सोपवण्यात आले. शुक्रवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी अभिनंदन यांनी मायदेशात प्रवेश केला. भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या सुटकेचे संपूर्ण श्रेय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

‘आज संघाला खूप अभिमान असेल…’

भाजपा नेते सुधांशू मित्तल यांच्या आरएसएसरवर आधारित पुस्तक प्रकाशनाच्या वेळी स्मृती इराणी यांनी असे म्हटले की, ‘आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खूप अभिमान असेल की आपल्या स्वयंसेवकाच्या पराक्रमामुळे भारताचा सुपूत्र फक्त ४८ तासात मायदेशी परतत आहे.’ नरेंद्र मोदी भाजपात येण्यापूर्वी आरएसएस प्रचारक होते, असे म्हणत त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.

- Advertisement -

आणि पाकने त्यांच्या सुटकेची घोषणा केली

भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकच्या विमानाचा शोध घेत असतांना २७ फेब्रुवारी रोजी अभिनंदन यांचे मिग २१ विमान अपघातग्रस्त होऊन पाकिस्तानच्या सीमेत कोसळले. दरम्यान, पॅराशूटच्या मदतीने खाली उतरत असलेल्या अभिनंदनला पाकने अटक केली. या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ पाकने जारी केले. त्या व्हिडीओमध्ये त्यांना मारहाण झाल्याच्या खुणाही दिसत होत्या. या व्हिडीओवर भारताने आक्षेप घेत जीनिव्हा करारानुसार अभिनंदन यांना भारताच्या हवाली करावे, अशी मागणी केली होती. यावेळी अमेरिका, सौदीसह चीनने पाकवर जोरदार दबाव टाकला आणि पाकने त्यांच्या सुटकेची घोषणा केली.

शांततेच्या मार्गाने पाकिस्तानने एक पाऊल टाकले, अशी बतावणी पाकचे पंतप्रधान इम्रान खानने केली होती. यासोबतच चर्चेचा प्रस्ताव भारतासमोर ठेवला होता. परंतू या अतिरेकी गटांवर योग्य ती कारवाई करा. नंतरच चर्चा करू असे भारताने सांगितले होते. यानंतर गेले दोन दिवस अभिनंदन यांच्या सुटकेकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले होते. मात्र काही तासांच्या प्रतिक्षेनंतर अभिनंदन भारतात परतले.

- Advertisement -

हे ही वाचा – देशाचा अभिमान पायलट अभिनंदन भारतात परतला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -