घरदेश-विदेशहायड्रॉक्सीक्लोरोक्वीनमुळे धोका नाही; WHO च्या बंदीनंतर ICMR दिलं स्पष्टीकरण

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनमुळे धोका नाही; WHO च्या बंदीनंतर ICMR दिलं स्पष्टीकरण

Subscribe

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे.

जगभरात कोरोना बाधितांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ)ने बंदी घातली. कोरोनाच्या उपचारासाठी मलेरियाचे औषध वापरु नये, अशा सूचना डब्लूएचओकडून दिल्या आहे. या दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे.

कोरोनावर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन काम करु शकते!

कोरोना व्हायरस हा नवीन आजार आहे. यावर विशेष कोणतीही उपचार पद्धत नाही आणि यावर औषधही उपलब्ध नसून त्यावर संशोधन सुरु आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर एम्स आणि दिल्लीतील ३ खासगी रुग्णालयांमध्ये कन्ट्रोल्ड अभ्यासही केला गेला असून या अभ्यासात हे औषध कोरोना व्हायरसवरही काम करु शकते तसेच त्याचे कोणते दुष्परिणाम नसल्याचे आयसीएमआरच्या एका अधिकाऱ्याने सांगतिले तसेच, त्यांनी हे औषध देताना रुग्णाची ईसीजी तपासण्याचा सल्ला देखील दिला आहे.

- Advertisement -

कोरोनाबाधितांवर उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांना WHO कडून स्थगिती!

कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता

कोरोना संकटाच्या काळात भारतासारखा देश हा कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी मलेरियाच्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा वापर करत आहे. तसेच इतर देशांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाची भारताने निर्यात देखील केली आहे. गेल्या आठवड्यात लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध घेणाऱ्या लोकांना हृदयासंबंधी आजार आणि मृत्यूचा धोका वाढला आहे. यामुळेच जागतिक स्तरावर या औषधाच्या वापरावर तूर्तास बंदी घातली गेली आहे.

हा निर्णय एका रिपोर्टच्या आधारे घेतल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. या रिपोर्टमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्यांमुळे कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. या रिपोर्टच्या आधारावर या गोळ्यांचा वापर बंद केल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -