घरदेश-विदेशदारु पिऊन किती झिंगला आहात, सांगणार मोबाईल अॅप

दारु पिऊन किती झिंगला आहात, सांगणार मोबाईल अॅप

Subscribe

तळीरामांसाठी आयआयटीच्या विद्यार्थी एक विशेष मोबाईल अॅप्लीकेशन बनवत आहेत. या अॅपद्वारे तळीरामांनी किती मद्यसेवन केले आहे या बद्दल माहिती मिळणार आहे.

वर्षभर तळीराम मद्यसेवन करतच असतात मात्र वर्षाच्या शेवटी येणारे वर्ष चांगले असावे असा बहाना देऊन तळीराम पुन्हा जोमाने मद्यपान करतात. तळीरामांना मद्य मिळाल्यानंतर किती पितील याचा काही नेम नसतो. यामुळे अनेकांना आपण किती मद्यसेवन करतो याबद्दलचा प्रश्न नेहेमीच पडतो. याचा परिणाम प्रकृतीवर होऊ नये याची भिती अनेकांना असते. मात्र शरीरात मद्याचे प्रमाण किती याबद्दल माहिती मिळवण्या प्रयत्न सहसा होत नाही. मात्र आता चंदीगढ येथील आयआयटीचे विद्यार्थी असे अॅप बनवणार आहे. या अॅपमुळे मद्य किती प्रमाणात प्यायला आहात या बद्दल तपशील महिती हे अॅप देणार आहे. असे अॅप बनवणारे भारत हा पहिचाल देश ठरेल असे मत आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

“आही ज्या अॅपचे निर्माण करत आहोत ते कोणत्याही स्मार्टफोन्स मधून डाऊनलोड करता येईल. पिणारा व्यक्ती किती नशेत असेल या बद्दल माहिती यातून मिळणार आहे. याच बरोबर कोणत्या मद्यामध्ये किती प्रमाणात अल्कोहोल असते याबद्दलची माहिती लोकांना मिळणार आहे. हे अॅप बनवण्यासाठी अजून दोन महिने लागणार आहे. मी माझ्या टीम सोबत या अॅपवर काम करत आहे.” – डॉ. अभिनव ढल, आयआयटी रोपर,  विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्राध्यापक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -