घरदेश-विदेशहैद्राबादमध्ये देशातले सर्वात मोठे फर्निचर दुकान

हैद्राबादमध्ये देशातले सर्वात मोठे फर्निचर दुकान

Subscribe

हैदराबादमध्ये पहिलेच दुकान सुरु होत असून पुढील काळात भारतातील २५ शहरांमध्ये हे दुकान सुरु होणार आहे. फर्निचरचे इतक्या भव्य स्वरुपातील देशातील हे पहिलेच दुकान असणार आहे.

१२ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर  Ikea ही आंतरराष्ट्रीय कंपनी भारतात आपले पाऊल रोवणार आहे. हैदराबादमध्ये या कंपनीचे फर्निचर दुकान उद्यापासून सर्वांसाठी खुले होणार आहे. हैदराबाद शहरापासून दूर हायटेक सिटी परीसरात तब्बल १३ एकर जागेवर हे दुकान उभारण्यात आले आहे. Ikea ही जगातली सर्वात मोठी फर्निचर कंपनी असून हैदराबादवासियांसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. येत्या काळात २५ मुख्य शहरांमध्ये देखील ही दुकाने सुरु होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

२०० रुपयांपासून सुरुवात

१३ एकर पसरलेल्या या दुकानात एकूण ७ हजार ५०० हून अधिक उत्पादने असणार आहेत. यातील १ हजाराहून अधिक उत्पादने ही २०० रुपये किंमतीपासून सुरु होणार आहे. त्यामुळे खिशाला परवडणाऱ्या दरांमध्ये ही उत्पादने मिळणार आहेत. इतक्या मोठ्या दुकानात असलेली उत्पादने महाग असतील, अशी भिती तुम्हाला असेल तर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या वस्तू या दुकानात असणार आहेत.

- Advertisement -
Ikea-store-sleepover
परदेशातील Ikea दुकान

रेस्टॉरंटही सुरु करणार

१३ एकर भव्य फर्निचरच्या दुकानात फेरफटका मारणे म्हणजे जरा कठीणच नाही का! स्वाभाविकपणे इतक्या मोठ्या दुकानात फिरायचे म्हटले तर वेळ जाणार आणि  भूक लागणारच!  भुकेमुळे ग्राहकांनी दुकानाबाहेर पडू नये त्यांना अधिक वेळ टिकवून ठेवण्यासाठी  पेटपूजेची सोय देखील या दुकानात असणार आहे. या दुकानात देखील परदेशातील दुकांनाप्रमाणे  एक रेस्टॉरंट असेल. परदेशातील बीफ आणि पोर्क बॉल वगळून भारतात चिकनचे विविध पदार्थ मासांहार प्रेमींसाठी ठेवले जाणार आहेत, अशी माहिती डेप्युटी कंट्री मॅनेजर पॅट्रिक अॅन्थोनी यांनी इकनॉमिक टाईम्सला दिली आहे.

लवकरच उद्योग प्रसार

हैदराबादमध्ये हे पहिलेच दुकान उद्यापासून सुरु होणार आहे. पुढील काळात भारतातील २५ शहरांमध्ये हे दुकान सुरु होणार आहे. फर्निचरचे इतक्या भव्य स्वरुपातील देशातील हे पहिलेच दुकान असणार आहे. घर, ऑफिस, दुकान यासाठी लागणारे फर्निचर या दुकानांमध्ये मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -