घरदेश-विदेशयोगींना ओवेसींचं प्रत्युत्तर

योगींना ओवेसींचं प्रत्युत्तर

Subscribe

मी देखील देशाचा नागरिक आहे. मी का जाईन? मला देखील समान हक्क आणि अधिकार असल्याचं म्हणत योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

तेलंगनामध्ये भाजपची सत्ता आल्यास एमआयएमचे नेते आणि सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसींनी निजामाप्रमाणे पळून जावे लागेल अशा शब्दात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ओवेसींवर टिका केली होती. त्याला आता असदुद्दीन ओवेसींनी देखील मी देखील देशाचा नागरिक आहे. मी का जाईन? मला देखील समान हक्क आणि अधिकार असल्याचं म्हणत योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाय, भारतीय मुस्लिमांनी मोहम्मद अली जीनांची दोन राष्ट्र ही थेअरी नाकारली. त्यांनी भारतात राहणं पसंत केलं. असं देखील ओवेसी यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं आहे. तेलंगनामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत आहे. विकारपूरमधील तंदूर येथे बोलत असताना योगी आदित्यनाथ यांनी थेट अकबरूद्दीन ओवेसींना लक्ष्य करत तेलंगनामध्ये भाजपची सत्ता आल्यास असदुद्दीन ओवेसींनी निजामाप्रमाणे पळून जावे लागेल अशी टीका केली होती. त्याला ओवेसींनी आज उत्तर दिलं आहे.

वाचा – एवढं मारेन की कानातून रक्त येईल – ओवेसी

तेलंगनामध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस, भाजप, एमआयएम यावेळी परस्परांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, असदुद्दीन ओवेसी हे देखील जातीनं या निवडणुकीमध्ये प्रचार करताना दिसत आहे. यावेळी प्रचाराची पातळी घसरल्याचं देखील पाहायाला मिळाली. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करतेवेळी अकबरुद्दीन यांची जीभ घसल्याचं पाहायला मिळालं. ‘चहावाल्या आम्हाला उसकवू नकोस. चहा-चहा ओरडताना लक्षात ठेवा की, मी एवढं मारेन की तुमच्या कानातून रक्त बाहेर येईल’, असं वादग्रस्त विधान अकबरुद्दीन ओवेसी यांनी मोदींना उद्देशून केलं होतं.

वाचा – सत्ता आल्यानंतर ओवेसींना पळवून लावू – योगी आदित्यनाथ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -