घरदेश-विदेशअणुयुद्धाची धमकी देणाऱ्या पाकला भारतासोबत युद्धात पराभवाची भिती

अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या पाकला भारतासोबत युद्धात पराभवाची भिती

Subscribe

'य़ुद्धाने सगळे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे त्याचे परिणाम दोन्ही देशाला भोगावे लागतील. पण जर भारतासोबत युद्ध झालेच आणि भारतासमोर पराभव झाला तरी अखेर पर्यंत लढू'

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान चांगलाच हादरला होता. तेव्हापासूनच पाकिस्तान अणु युद्धाच्या धमक्या भारताला देत आहेत. मात्र पाकिस्तानला भारतासोबत युद्ध केल्यास चांगल्याच पराभवाला सामोरे जाण्याची भिती वाटू लागली आहे. यापुर्वी झालेल्या युद्धात पाकिस्तानचा चांगलाच पराभव झाला असला तरी भारताच्या लष्काराची शक्ती तसेच पराभव पदरी पडून देखील पाकिस्तान सुधारला नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दोन ते तीन वेळा अणुयुद्धाची धमकी दिली आहे. इम्रान खान यांनी नुकतीच ‘अल जजीरा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांना भारताबरोबरील अणुयुद्धाच्या धमक्यांबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, भारतासोबत जर युद्ध झाले तर पाक तोंडावर आपटेल.

- Advertisement -

तसेच पाक कधीही युद्धाला सुरूवात करणार नाही. मी शांतिप्रिय आणि युद्धाच्या विरोधात आहे. य़ुद्धाने सगळे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे त्याचे परिणाम दोन्ही देशाला भोगावे लागतील. पण जर भारतासोबत युद्ध झालेच आणि भारतासमोर पराभव झाला तरी अखेर पर्यंत लढू, असे इम्रान खान म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -