घरदेश-विदेशपाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान समलिंगी, पत्नीचा आरोप

पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान समलिंगी, पत्नीचा आरोप

Subscribe

माजी पाकिस्तानी क्रिकेटर आणि आता राजकारणात सक्रिय असणारा इम्रान खान त्याच्या माजी पत्नीच्या आत्मचरित्रामुळं चर्चेत आला आहे. इम्रानबद्दल रोज नवा खुलासा समोर येत आहे. इम्रानची पूर्वपत्नी रेहम खाननं इम्रान खान समलिंगी असल्याचा खुलासा आपल्या आत्मचरित्रामध्ये केला आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीसमोर तिनं याबद्दल माहिती दिली.

इम्रान खान समलिंगी असल्याचा खळबळजनक खुलासा

इम्रान खान हा समलिंगी असून पाकिस्तानी पक्ष तहरीक-ए-इन्साफमधील अनेक सदस्यांशी त्याचे शारिरीक संबंध असल्याचा खळबळजनक खुलासा त्याची पूर्वपत्नी रेहम खान हिनं केला. याआधी तिनं इम्रानवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. रेहमचं हे पुस्तक येत्या काही दिवसात प्रसिद्ध होणार असून पाकिस्तानात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर इम्रान खानला बदनाम करण्यात येत नाही ना? असाही एक सूर सध्या लोकांमध्ये दिसून येतो आहे.

- Advertisement -

‘अतिशय शांत मनानं मी पुस्तक लिहिलं आहे’ – रेहम खान

‘हे पुस्तक इम्रानविषयी नसून माझ्याबद्दल आहे. मुलगी, पत्नी आणि पालक म्हणून मी कशी आहे याबद्दल हे पुस्तक आहे. कदाचित माझा अनुभव दुसऱ्या लोकांसाठी उपयोगी ठरेल. हे पुस्तक मी अतिशय शांत मनानं लिहीलं असून माझे विचार यामध्ये मांडले आहेत. ज्यांना या पुस्तकाची भीती वाटत आहे, तेच लोक निवडणुकीचं कारण पुढे करत आहेत. या सगळ्या गोष्टी लोकांना माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून मी लिहिलं आहे.’ एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं सांगितलं. इम्रानबरोबरील आपलं लग्न का टिकलं नाही? या प्रश्नावर ‘काहीही व्यक्तीगत नसून मला माझ्याबद्दलच लिहायचं होतं आणि जे काही घडलं ते मी स्पष्ट पुस्तकात मांडलं आहे. कोणतंही वैयक्तिक भांडण नसून माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम होतं.’

प्रकाशनापूर्वीच काही भाग झाला लीक

या पुस्तकाचा काही भाग लीक झाला आहे. पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान, पाकिस्तानी अभिनेता हमजा अली अब्बासी आणि पक्षातील सदस्य मुराद सईद हे समलिंगी असून, त्यांच्यात शारीरिक संबंध आहेत, असा दावा तिनं पुस्तकात केला आहे. याशिवाय तिनं पाकिस्तानी खेळाडू वसीम अक्रमबाबतही काही आरोप केले आहेत. या सर्व आरोपत अजूनही अक्रमनं मौन बाळगलं असून मुराद सईद यांनी ट्विट करून हा आरोप फेटाळला आहे. शिवाय आपल्या आणि इतरांबद्दल जे लिहिलं गेलं आहे, त्यावर काहीही बोलण्यासारखं नाही. तिच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण निशाणा साधत आहे, हे लक्षात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -