दहशतवादावर पाकच्या उलट्या बोंबा

दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी पुन्हा एकदा पलटी खाल्ली आहे. भारतात देखील पाकिस्तानला हवे असलेले दहशतवादी लपून बसल्याची बोंब इम्नान खान यांनी मारली आहे.

Islamabad
Imran khan
इमरान खान

दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी पुन्हा एकदा पलटी खाल्ली आहे. भारतात देखील पाकिस्तानला हवे असलेले दहशतवादी लपून बसल्याची बोंब इम्नान खान यांनी मारली आहे. इस्लामाबादमध्ये त्यांना दाऊद इब्राहिम बद्दल विचारले गेले. त्यावेळी त्यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला भारतात देखील पाकिस्तानला हवे असलेले दहशतवादी लपून बसले आहेत अशी उलटी बोंब मारली. १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यावरील दहशतवादी हाफिज सईद पाकिस्तानमध्ये लपून बसले आहेत. UNच्या सिक्युरिटी काऊंसिलनं याबद्दलची माहिती जाहीर देखील केली आहे. त्यानंतर पाकिस्तान दहशतवादांचं आश्रयस्थान झाल्याचं स्पष्ट झालं. यावर जेव्हा इम्नान खान यांना भारतीय पत्रकारानं प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पाकिस्तानला हवे असलेले दहशतवादी भारतात लपून बसले आहेत असा आरोप केला. दरम्यान बुधवारी बोलताना इम्नान खान यांनी पाकिस्तानला भारतासोबत सदृढ संबंध हवेत असं म्हटलं होतं. भारताला हव्या असलेल्या दहशतवाद्यांची यादी भारतानं पाकिस्तानकडे सुपूर्द केली आहे.

पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असल्याची बाब वेळोवेळी स्पष्ट झालेली आहे. शिवाय भारतानं त्याबद्दल आपला निषेध देखील नोंदवला आहे. पण, त्यानंतर देखील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर इम्नान खान यांनी भारताशी संबंध सुधारण्यावर भर दिला जाईल अशी घोषणा केली. पण, प्रत्यक्षात मात्र इम्नान खान यांच्या शपथविधीनंतर दहशतवादी कारवाया वाढल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. त्यानंतर आता इम्नान खान यांनी दहशतवादाच्या मुद्यावर उलटी बोंब मारली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here