घरदेश-विदेश'नवज्योत सिंग सिद्धु शांतीदूत'

‘नवज्योत सिंग सिद्धु शांतीदूत’

Subscribe

नवज्योत सिंग सिद्धु शांतीदूत आहेत. त्यांच्यावर टीका करणे अयोग्य असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्नान खान यांनी दिली आहे.

नवज्योत सिंग सिद्धु शांतीदूत असून शपथविधी सोहळ्याला आल्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला भारतातून केवळ नवज्योत सिंग सिद्धुनं हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान नवज्योत सिंग सिद्धुनं पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. त्यावर स्पष्टीकरण देताना पाकिस्तानला शांती हवी असा युक्तीवाद नवज्योत सिंग सिद्धुनं केला. पण भारतामध्ये मात्र त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. यावेळी लोकांनी रस्त्यावर उतरून सिद्धुचा पुतळा जाळला. सिद्धु मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या केला. राजकीय वर्तुळातून देखील त्यावर तीव्र अशा प्रतिक्रिया दिल्या गेल्या. यावेळी सिद्धुचा बचाव करण्यासाठी खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मैदानात उतरले असून त्यांनी सिद्धुची पाठराखण केली आहे.

- Advertisement -
वाचा – नवज्योत सिंग सिद्धूची ‘ती’ मिठी आणि वाद

अमरिंदर सिंग यांची टीका

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सिद्धुने बाजवा यांना मारलेल्या मिठीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. देशावर जवान शहीद होत आहेत. पाकिस्तानच्या लष्कप्रमुखांच्या हातामध्ये या गोष्टी रोखणे शक्य आहे. त्यानंतर देखील सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. त्यामुळे सिद्धु यांची कृती समर्थनीय नाही असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

भाजपची टीका

नवज्योत सिंग सिद्धु यांच्या कृतीवर भाजपने देखील टीका केली आहे. इकडे जवान शहीद होतात आणि तिकडे जाऊन पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना मिठ्ठ्या मारणं किती योग्य? असा सवाल भाजपचे प्रवक्ते संदीप पात्रा यांनी केला आहे. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता यावर काहीच का बोलत नाहीत? असा सवाल देखील पात्रा यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -