घरCORONA UPDATEअरे बापरे...! अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे २० हजार नवे रुग्ण

अरे बापरे…! अमेरिकेत एका दिवसात कोरोनाचे २० हजार नवे रुग्ण

Subscribe

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल १ लाख ६४ हजार २६६ वर पोहोचला आहे. तर ३ हजार १७० हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

जगातील सर्वात सामर्थ्यवान देश, कोरोना विषाणूने ग्रासलेला आहे. कोरोना अमेरिकेत कहर करत असून रुग्णालयात बेड कमी पडायला लागले आहेत. अमेरिकामध्ये गेल्या २४ तासांमध्ये २० हजार ३५३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ६४ हजार २६६वर पोहचला आहे. यामुळे रुग्णालयात संसाधनांचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाढत्या रुग्णांमुळे व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. रुग्णालयाची कमतरता भासत असल्याने उद्याने रूग्णालयात रूपांतरित केली जात आहेत. मदतीसाठी सैन्य मागविण्यात आले आहे. यासह मंडपातच तात्पुरती व्यवस्था करून कोरोनाची चाचणी घेण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या सल्लागारांनी असे म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे कमीतकमी दोन लाख लोक मारले जाऊ शकतात.


हेही वाचा – धक्कादायक: प्रवास इतिहासाची माहिती अधिकाऱ्यांना दिली म्हणून केला खून

- Advertisement -

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल १ लाख ६४ हजार २६६ वर पोहोचला आहे. तर ३ हजार १७० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५ हजार ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी २० हजार ३५३ नव्याने रुग्ण आढळले आहेत. तर ५७३ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण हे न्यू यॉर्कमध्ये ६७ हजार ३२५ रुग्ण आढळले आहेत, तर १ हजार ३४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

सार्वजनिक उद्यानात रुग्णालय बांधले जात आहे

यानंतर, अमेरिका खूप सावध आहे. पीटीआयच्या अहवालानुसार अमेरिकेत सध्या युद्धासारखी परिस्थिती आहे. घाईघाईने रुग्णालय बांधण्यासाठी सैन्याची मदत घेतली जात आहे. जागेअभावी अधिवेशन केंद्र, रेस ट्रॅक आणि सार्वजनिक उद्यानात तात्पुरते रुग्णालय बांधले जात आहे.

- Advertisement -

ऑटोमोबाईल कंपन्या बनवत आहेत व्हेंटिलेटर

यूएस ऑटो कंपन्यांनी यावेळी कार व वाहनांचे उत्पादन थांबविले आहे. त्याऐवजी या कंपन्या व्हेंटिलेटर बनवतात. या व्यतिरिक्त या कंपन्या इतर उपचार साधने बनवत आहेत.

पुढील ३० दिवसांचा काळ आव्हानात्मक

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पुढील ३० दिवस हे खूप महत्वाचे आणि आव्हानात्मक आहेत. ट्रम्प म्हणाले, ‘या युद्धामध्ये प्रत्येक नागरिकाने भूमिका बजावली पाहिजे. हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. पुढचे ३० दिवसांचा काळ आव्हानात्मक आहे. “ट्रम्प म्हणाले की आपण जितक्या लवकर या रोगाचा संघर्ष करू तेवढ्या लवकर आपण जिंकू.


हेही वाचा – मास्क ते वेंटिलेटर…जाणून घ्या भारताची कोरोना विरुद्धची तयारी


न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ६८ खाटांचे रुग्णालय

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील सेंट्रल पार्कमधील माउंट सिनाई हॉस्पिटलच्या सहकाऱ्याने ६८ खाटांचे एक रुग्णालय बांधण्यात येत आहे. वास्तविक हे तंबूत कार्यरत असणारे एक रुग्णालय आहे. न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासिओ म्हणाले की आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची व्यवस्था केली आहे. या रुग्णालयात कोरोना चाचणी करता येते. तसेच कोरोना पीडित व्यक्तींवरही उपचार केले जातात. येथे श्वसनाच्या समस्येने ग्रस्त लोकांवर उपचार केले जाऊ शकतात. मी तुम्हाला सांगतो की अमेरिकेचे न्यूयॉर्क शहर कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -