Coronavirus: अमेरिकेत करोनाचा कहर; दिवसात दहा हजार नवे रुग्ण

एकट्या न्यूयॉर्कमध्ये करोनाचे २५,००० हून अधिक रिग्ण आढळले आहेत.

New york
corona patients

जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणुने अमेरिकेत तर कहरच केला आहे. अमेरिकेत सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, असे असताना करोनाने रौद्ररुप धारण केले आहे. दरम्यान, अमेरिकेत एका दिवसात तब्बल १०,००० नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे करोग्रस्तांच्या संख्येत अमेरिका तीसऱ्या क्रमांकावर आहे.

अमेरिकेत एका दिवसात १०,००० करोनाबाधीत आढळले आहेत. तर करोनाने एका दिवसात १५० जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी करोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच हजार नवे रग्ण आढळले आहेत. एकट्या न्यूयॉर्कमध्ये करोनाचे २५,००० हून अधिक रिग्ण आढळले आहेत. तर २१० करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेने करोनाचा सामना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहिर केले आहे. तर अमेरिकेने चीनविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा – या संकटातही काहीतरी सकारात्मक घडतंय – उद्धव ठाकरे!

Covid-19 विषाणुवर लक्ष ठेवून असणाऱ्या वर्ल्डोमीटरच्या वेबसाईटनूसार मंगळवारी तब्बल १०,००० करोनाब्रस्त आढळले. त्यामुळे करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ५४,९४१ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ७८४ वर पोहोचली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here