चीनमध्ये आता वन्य प्राण्यांना खाल्ल्यास ठरेल गुन्हा

बीजिंगमधील सर्व भागात वन्य प्राण्यांची हत्या करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Beijing
china

चीनमध्ये करोन विषाणूची लागण कशी झाली यावर सध्यातरी निश्चित कारण सापडले नसले तरी वन्य प्राण्यांपासून अशा विषाणूंचा संसर्ग होत असल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर बीजिंग म्युनिसिपल पीपल्स कॉंग्रेसच्या १५ व्या स्थायी समितीच्या बैठकीत लोकांचे आरोग्य व जीवनमान सुरक्षित करण्यासाठी वन्य प्राणी खाण्याच्या वाईट सवयी दूर करण्यासाठी वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि व्यवस्थापन यावर कायदा कारण्यावर गुरुवारी चर्चा झाली असून त्या प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. या कायद्यानुसार वन्य जीवांची शिकार करणे आणि त्यांचे सेवन करणे दंडात्मक गुन्हा ठरणार आहे. तसेच वन्य प्राण्यांनी वस्ती असलेल्या ठिकाणी वन्यजीव रोग निरीक्षण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.


हेही वाचा – Coronavirus: लॉकडऊनने करोनाला रोखता येणार नाही…!

बीजिंग येथे वन्यप्राण्यांची समृद्ध संख्या आहे, त्यामुळे तिथे वन्य प्राण्यांची शिकार प्रचलित होती. या मसुद्याच्या नियमावलीनुसार राजधानी बीजिंगमधील सर्व भागात वन्य प्राण्यांची हत्या करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास दंड ठोठावण्यात येईल, असे म्हटले आहे. या कायद्याच्या मसुद्यातील नियमांनुसार सर्व वन्य प्राणी आणि काही जलीय वन्य प्राणी यांचे सेवन करणे, बाजारात त्यांची विक्री करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास सेवन केलेल्या वन्य प्राण्यांच्या किंमतीपेक्षा दोन ते १५ पट दंड वसूल केला जाणार आहे.

कोविड-१९ या विषाणूचा स्त्रोत अद्याप निश्चित झालेला नसला तरी संशोधकांनी असे म्हटले आहे की ७० टक्के पेक्षा जास्त नवीन संसर्गजन्य रोग वन्य प्राण्यांपासून उद्भवतात. याचा परिणाम म्हणून, या प्रस्तावित कायद्यात वन्यजीवांपासून संसर्ग होणाऱ्या रोगाचा सर्वाधिक धोका असलेल्या भागात वन्यजीव रोग निरीक्षण कक्ष सुरू करण्याची योजनादेखील समाविष्ट करण्यात आली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here