घरदेश-विदेशदिल्लीः कोरोना लसीच्या नावावर दिलं विष, असा झाला खुलासा

दिल्लीः कोरोना लसीच्या नावावर दिलं विष, असा झाला खुलासा

Subscribe

सूड घेण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आला होता.

दिल्लीच्या अलीपूर भागात एकाच कुटुंबातील चार जणांना आरोग्य कर्मचारी म्हणून आलेल्या महिलांनी त्यांना औषध सांगून विषारी विषारी औषध दिलं. यामुळे होमगार्ड, त्याची आई, काका आणि दुसरा नातेवाईक बेशुद्ध पडले. चारही जणांना जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर शेजाऱ्यांनी सर्वांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं. चौघांनाही राजा हरिश्चंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्वांचीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

पोलिस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी तीनच्या सुमारास दोन महिला होमगार्ड विक्रम यांच्या घरी पोहोचल्या. त्यांनी आरोग्य विभागातून आलो असं सांगितलं. ज्याप्रमाणे पोलिओ औषध दिले जाते, त्याचप्रमाणे ओरोग्य विभाग कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून दिल्लीत घरोघरी औषधे देत आहे. यानंतर या दोघांनी औषधाच्या नावाखाली विक्रम, त्याची आई, काका आणि नातेवाईकांना विषारी औषध पाजलं. त्यानंतर दोन्ही महिला घटनास्थळावरून फरार झाल्या. दोन दिवसांच्या तपासणीनंतर पोलिसांनी दोन्ही महिलांना अलीपूर सीमेवरून अटक केली. पोलिसांच्या चौकशीत हा कट असल्याचं समोर आलं. या दोघींनी पोलिसांच्या चौकशीत सांगितलं की त्या प्रदीप नामक व्यक्तीच्या बॅगेच्या कारखान्यात काम करतात. हा कट दिल्ली बाहेरील रमजानपूर येथे राहणारा प्रदीप याने रचला. पोलिसांनी प्रदीपला रमजानपूर येथून अटकही केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – क्वारंटाइन सेंटरमधील महिलेचा बनवला अश्लील व्हिडिओ; दोघांना अटक


काही महिन्यांपूर्वी विक्रम आणि प्रदीप हे शेजारीच होते. प्रदीपच्या पत्नीशी विक्रमचे संबंध असल्याचा आरोप आहे. प्रदीपला जेव्हा हे कळले तेव्हा विक्रमशी त्याचं मोठं भांडण झालं. कंटाळून प्रदीपने घर बदललं. असे असूनही विक्रमने प्रदीपच्या पत्नीला भेटणं थांबवलं नाही. यामुळे सूड घेण्याच्या उद्देशाने प्रदीपने संपूर्ण कुटूंब संपवण्याचा कट रचला. यानंतर प्रदीपने त्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या दोन महिलांना पैशासाठी आमिष दाखवत दोघींना तयार केलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -