घरदेश-विदेशगुजरातमध्ये काँग्रेसला घरघर, राज्यसभा निवडणुकीपूर्वी ८ आमदारांचा राजीनामा

गुजरातमध्ये काँग्रेसला घरघर, राज्यसभा निवडणुकीपूर्वी ८ आमदारांचा राजीनामा

Subscribe

राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर ऐन कोरोना काळात काँग्रेसला घरघर लागली आहे. काँग्रेसच्या ८ आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकलं आहे.

राज्यसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर ऐन कोरोना काळात काँग्रेसला घरघर लागली आहे. येत्या १९ जूनला राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. गुजरातमधील राज्यसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून कॉंग्रेसच्या आमदारांचा राजीनामा देण्याचं सत्र सुरुच आहे. आतापर्यंत ८ आमदारांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. यापूर्वी तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये कर्जन मतदारसंघातून आमदार अक्षय पटेल, कपर्डा मतदारसंघातील आमदार जीतू चौधरी आणि मोरबी येथील ब्रिजेश मेरजा यांनी राजीनामे दिले. ब्रिजेश मेरजा यांनी आज सभापतींकडे आपला राजीनामा सुपुर्द केला.

राज्यसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला कॉंग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला. गड्डा येथील प्रवीण मारू, लिंबडी येथील सोमा पटेल, अब्दासा येथील प्रद्युम्नसिंग जडेजा, धारी येथील जे.व्ही. काकडिया आणि दांग येथील मंगल गावित यांनी राजीनामा सादर केला होता. तर काल कर्जन मतदारसंघातून आमदार अक्षय पटेल आणि कपर्डा मतदारसंघातील आमदार जीतू चौधरी यांनी राजीनामे दिले. कॉंग्रेसचे दोन्ही आमदार बुधवारी संध्याकाळी राजीनामा घेऊन माझ्याकडे आले, असं गुजरातचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी काल सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – स्वॅब टेस्ट करुन दिले बनावट कोरोना रिपोर्ट, मुंबइतील धक्कादायक प्रकार


राज्यसभेच्या २४ जागांसाठी १९ जून रोजी निवडणूक होणार आहे. यापैकी १८ जागा अशा आहेत जिथे कोरोना विषाणूमुळे मतदान पुढे ढकललं गेलं. याखेरीज तीन राज्यातील आणखी सहा जागांचा समावेश आहे. १८ जागांपैकी ४ जागा आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या, दोन झारखंडमधील, तीन मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आणि प्रत्येकी एक मणिपूर आणि मेघालयातील आहे. १९ जून रोजी संध्याकाळी मतमोजणी होईल. यासह कर्नाटक ४, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – गुजरातमध्ये काँग्रेसला गळती; राज्यसभा निवडणुकीआधी दोन आमदारांचा राजीनामा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -