देशात गेल्या २४ तासांत ६,६५४ नव्या रुग्णांची नोंद; १३७ जणांचा मृत्यू

भारतात कोरोना रूग्णांचा आकडा आतापर्यंत १ लाख २५ हजाराच्या वर गेला आहे, तर आतापर्यंत ३७२० जणांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai
coronavirus in india
प्रातिनिधिक छायाचित्र

भारतात गेल्या २४ तासांत ६,६५४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आता देशात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या १,२५,१०१ वर पोहोचली आहे. यापैकी ६९,५९७ सक्रिय प्रकरणं आहेत. त्याच वेळी, कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३७२० झाली आहे. तथापि, ही दिलासादायक बाब आहे की उपचारानंतर ५१,७८४ रुग्ण बरे झाले आहेत.

दरम्यान, राज्यातल्या रुग्णांचा एकूण आकडा शुक्रवारी ४४ हजार ५८२ झाला आहे. याशिवाय शुक्रवारी राज्यात ६३ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा दीड हजारांच्या पार जात १५१७ इतका झाला आहे. तथापि, दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत १४ नवीन हॉटस्पॉट्स तयार करण्यात आले, जे आतापर्यंतच्या दिवसातील सर्वात जास्त हॉटस्पॉट रेकॉर्ड आहे. यासह दिल्लीतील कंटेनमेंट झोनची एकूण संख्या आता ९२ वर पोहोचली आहे. तर, दिल्लीचा एक भाग देखील कंटेनमेंट झोनच्या यादीतून वगळण्यात आला आहे.


हेही वाचा – वारली आदिवासींच्या उठावाला ७५ वर्षे पुर्ण


आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, आतापर्यंत ४०.९७ टक्के रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. यामध्ये परदेशीही आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने शहरांमध्ये झालेला आहे. करोनाचे ८० टक्के रुग्ण आणि मृत्यू फक्त पाच राज्यांमध्ये आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये आहेत. यामध्ये कोरोनाचे ६० टक्के रुग्ण आणि मृत्यू फक्त मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद आणि ठाणे पाच शहरांमध्ये असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here