घरदेश-विदेशदेशात एका महिन्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल ५ पटीने वाढ!

देशात एका महिन्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल ५ पटीने वाढ!

Subscribe

तज्ज्ञांच्या मते, आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देशांसाठी जून हा महिना अधिक धोकादायक

जगभरासह देशात कोरोनाचा कहर वाढताना दिसतोय. कोव्हिड १९ इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत १ लाख ९४ हजार ७०० लोकांना कोरोनाची लागण झाली असून ५ हजार ५७१ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता मात्र तो १ जूनपासून अनलॉक करण्यात आला आहे. देश अनलॉक केला याचा अर्थ भारतात कोरोनाचा संसर्ग व त्याचा धोका कमी झाला का? हे अद्याप सांगणे कठीणच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचे रुग्णांची संख्या भारतात एका महिन्यात ५ पटीने वाढल्याचे सांगण्यात येत आहे. साधारण १ जूनपर्यंत भारतात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या १ लाखांहून अधिक झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनाचे साधारण ८ हजार ३९२ रूग्ण आढळले असून २३० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासातील हा मृतांचा आकडा सर्वाधिक आहे.

- Advertisement -

देशात कोरोना रूग्णात ५ पटीने वाढ

भारतात १ मे रोजी कोरोना रूग्णांची संख्या ३७ हजार २५७ इतकी होती. जी सध्या १.९० लाखांच्यावर पोहोचली आहे. यावरुन असे लक्षात येत की, मे महिन्यामध्ये कोरोनाचे रुग्ण भारतात ५ पटीने वाढले असून कोरोना आजाराने ग्रस्त देशांच्या यादीत भारत आता सातव्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे.

जून हा महिना अधिक धोकादायक

भारतात १ जूनपासून लॉकडाऊनच्या ठिकाणी अनलॉक -१ लागू करण्यात आला आहे. असून या लॉकडाऊनचे निर्बंध भारतातून हळूहळू हटविण्यात येत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे देखील उल्लंघन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्याप कोरोना व्हायरसवर कोणतेही औषध किंवा लस नसल्याने जूनमध्ये कोरोनाची संख्या अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, आशियाई आणि दक्षिण अमेरिकन देशांसाठी जून हा महिना अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.


स्थलांतरीत मजुरांमुळे देशाला खूप मोठी किंमत मोजावी लागणार – तज्ज्ञांनी दिला अहवाल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -