Coronavirus: इटलीत करोनाचं थैमान; दिवसरात्र येतोय केवळ अँबुलन्सचा आवाज

इटलीमध्ये दिवसाला ५०० जणांचा मृत्यू होत आहे.

Rome
italy deaths
इटलीमध्ये दिवसाला ५०० जणांचा मृत्यू होत आहे.

करोना विषाणुने चीनमध्ये थैमान घातल्यानंतर आता इटलीला आपल्या विळख्यात घेतले आहे. इटलीमध्ये दिवसरात्र केवळ अँबुलन्सचा आवाज येत आहे. इटलीमध्ये करोना विषाणुमुळे गेल्या २४ तासांत ६८०पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नागरी संरक्षण एजन्सीने बुधवारी दिली. आता इटलीच्या दक्षिण भागाकडे देखील हा विषाणू पसरत आहे. इटलीमध्ये इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात झालेल्या संक्रमणामुळे ७,५०३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

इटलीच्या लोम्बार्डी भागात आजपर्यंतचा सर्वात मोठा फटका बसला आहे. मृत्यू आणि नवीन संसर्गांच्या संख्येत बुधवारी मोठी घसरण दिसून आली आहे. ज्या भागातून करोना पसरला त्या भागातून कमी कमी होत आहे. हे केवळ लॉकडाऊनमुळे शक्य झाले आहे.


हेही वाचा – Coronavirus – तर भारतात ३ लाख करोनाग्रस्त, वैज्ञानिकांचा इशारा!

इटलीमध्ये करोनाचे ७४ हजार ३८६ रुग्ण आहेत. तर ७ हजार ५०३ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये दिवसाला सरासरी ५०० जणांचा मृत्यू होत आहे. इटलीमध्ये सर्वोत्तम वैद्यकिय सेवा आहे. मात्र, करोनावर त्यांना अद्याप मात करता आलेली नाही. इटलीने करोनापुढे हात टेकले आहेत.

गेल्या ६ दिवसात इटलीने गमावलेले जीव

२० मार्च – ६२७

२१ मार्च – ७९३

२२ मार्च – ६५१

२३ मार्च – ६०१

२४ मार्च – ७५३

२५ मार्च – ६८३

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here