दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण; स्वत: ट्वीटकरून दिली माहिती

सोमवारी दिल्लीत ३,२२९ नवीन रुग्णांसह एकूण कोरोनाची संख्या २ लाख २१ हजार ५३३ वर

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. सिसोदिया यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मनीष सिसोदिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, थोडा ताप आल्यानंतर आज कोरोना चाचणी करून घेतली, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी स्वत: ला आयसोलेट केले आहे. सध्या ताप किंवा इतर कोणतीही लक्षण नसून मी पूर्णपणे ठीक आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांतून बरे झाल्यावर मी पुन्हा कामावर परत रुजू होईल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत दिल्लीत ३,२२९ नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आम आदमी पक्षाचे तीन आमदार गिरीश सोनी, प्रमिला टोकस आणि विशाल रवी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. याशिवाय दिल्ली विधानसभेच्या तीन कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी भारतात कोविड -१९ चे ९२ हजार ०७१ नवीन रुग्ण आढळले आणि सोमवारी संसर्ग झालेल्यांची संख्या ४८ लाखांच्या पुढे गेली आहे.

दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत ३,२२९ नवीन रुग्णांसह एकूण कोरोनाची संख्या २ लाख २१ हजार ५३३ वर पोहोचली आहे. दिल्लीत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ४, ७७० वर पोहोचली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, कोरोनासाठी दिल्लीत दररोज ६० हजार चाचण्या घेतल्या जात आहेत. दिल्लीमध्ये दर दहा लाख लोकसंख्येत दररोज ३ हजार चाचण्या घेतल्या जातात. ही संख्या संपूर्ण जगात सर्वाधिक आहे.


Corona in Maharashtra: राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक! आज १७,०६६ नव्या रुग्णांची नोंद