धक्कादायक! २४ तासांत BSF चे ५३ जण कोरोना पॉझिटिव्ह

मागील २४ तासांत सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) च्या आणखी ५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर चार जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या ३५४ जणांवर उपचार सुरु आहेत.

New Delhi
coronavirus
कोरोना व्हायरस

भारताच्या निमलष्करी दलामध्ये देखील कोरोना विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासांत सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) च्या आणखी ५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर चार जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या ३५४ जणांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ६५९ जणांनी करोनावर मात केली असल्याची माहिती, बीएसएफकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या अगोदर सोमवारी २४ तासांत २१ जवान करोना पॉझिटिव्ह आढळल्याची नोंद झाली होती. तर १८ जणांनी करोनावर मात केली होती.

२४ तासांत १८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ!

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात १८ हजार ५२२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ६६ हजार ८४० वर पोहोचली असून २ लाख १५ हजार १२५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत १६ हजार ८९३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


हेही वाचा – Tiktok चे स्पष्टीकरण; कोणतीही माहिती परदेशी सरकारला दिली नाही


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here