घरदेश-विदेशगेल्या ६ वर्षात आरोग्य क्षेत्रासाठी मोठे निर्णय घेतले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या ६ वर्षात आरोग्य क्षेत्रासाठी मोठे निर्णय घेतले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Subscribe

देशात जागतिक स्तरावरील वैद्यकीय सुविधा सुरू करण्याचं आमचं उद्दीष्ट असून प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं लक्ष्य आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कर्नाटकमधील राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केलं. दुसर्‍या महायुद्धानंतर, आज सर्वात मोठं संकट आलं आहे, जसं जागतिक युद्धानंतर जग बदललं. त्याच प्रकारे कोरोना नंतर, जग पूर्णपणे बदलले जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत भारताने गेल्या ६ वर्षात मोठे निर्णय घेतले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. यासह जागतिकीकरणाबाबतच्या आर्थिक विषयावर चर्चा होती, पण आता मानवतेच्या आधारे चर्चा होणे आवश्यक आहे, असं देखील ते म्हणाले.

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आयुष्मान भारत योजनेमुळे देशातील एक कोटीहून अधिक लोकांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावर विनाशुल्क उपचार केले गेले. देशात जागतिक स्तरावरील वैद्यकीय सुविधा सुरू करण्याचं आमचं उद्दीष्ट आहे, त्याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आज आरोग्य कर्मचारी सैनिकांप्रमाणे काम करत आहेत आणि देशासाठी लढत आहेत. कोरोना विषाणू दिसत नाही, परंतु कोरोना योद्ध्यांचे कठोर परिश्रम आज दिसून येत आहेत. जगाचे डोळे आज भारतीय डॉक्टरांवर केंद्रित आहेत, असं देखील ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तान कर्ज घेण्याचा विक्रम करणार; १५ अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्याची योजना


पंतप्रधान म्हणाले की मिशन इंद्रधनुष, आयुष्मान भारत यांच्यासह अनेक महत्त्वाच्या योजनांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला नवी संजीवनी दिली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत आरोग्य सुविधांविषयी पीएम मोदी म्हणाले की, आज देशात पीपीई किट, एन-९५ मास्क बनवले गेले आहेत. आरोग्य सेतु अॅप देशात बनविण्यात आले आहे आणि आतापर्यंत १२० दशलक्ष लोकांनी हे अॅप डाउनलोड केलं आहे. देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेत घडणाऱ्या घटनांबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत. जो कोणी यात दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असं देखील मोदी म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -