घरदेश-विदेशआयकर परताव्यासाठी आता १५ दिवसांची मुदत वाढ

आयकर परताव्यासाठी आता १५ दिवसांची मुदत वाढ

Subscribe

प्राप्तिकर परतावा भरण्याच्या मुदतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. आता ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत प्राप्तिकर परतावा भरता येणार आहे

प्राप्तिकर परतावा भरण्याच्या मुदतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ही १५ दिवसांची वाढ असून आता तुम्हाला ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत प्राप्तिकर परतावा भरता येणार आहे. यापूर्वी नागरीकांना ३१ ऑगस्ट आणि त्या आधी ३१ जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली होती. वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्राप्तिकर परतावा दाखल करावयाची करदात्यांसाठी शेवटची तारीख वाढवून आता ३१ ऑक्टोबर २०१८ झाली आहे. केंद्र सरकारने आज, सोमवारी मुदत वाढीची घोषणा केली असून त्यांच्या इन्कम टॅक्स इंडिया या ट्विटर हँडलवर त्यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

१५ दिवसांची मुदत वाढ 

आयकर विभागाने ही मुदतवाढ १५ ऑक्टोबर २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१८ म्हणजे १५ दिवसांची वाढ झाली आहे. यापूर्वी ती ३१ सप्टेंबर २०१८ इतकी होती. या कालावधीत २०१७-१८ या आर्थिक वर्षातील आयकर परतावा भरता येणार आहे. मुदत वाढ केलेल्या तारखेच्या आत आयकर अधिनियम, कलम २३४ ए इन्कम टॅक्स अॅक्ट, १९६१ नुसार परतावा भरावा लागणार आहे, असे केंद्रीय आयकर संचालक मंडळाने सोमवारी सांगितले.

आयकर परताव्याची प्रक्रीया

ज्या व्यक्तीचे उत्पन्न नोकरीपासून तसेच इतर उत्पन्न असेल, तर त्याला प्राप्तिकराचा आयटीआर १ आणि आयटीआर २ दाखल करावा लागतो. आयटीआर ३ मध्ये जीएसटीची माहिती द्यावी लागणार आहे. करदात्याला विक्रीवरील सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी किती आकारला, ती रक्कम नमूद करावी लागेल. ही माहिती करदात्याला जीएसटी पोर्टलवरील इलेक्ट्रॉनिक लायबलिटी रजिस्ट्ररसोबत जुळवून घ्यावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -