चीफ ऑफ डिफेन्समुळे संरक्षण सामर्थ्यात वाढ होणार – मोदी

मोदी यावेळी संबोधित करताना कोणकोणत्या विषयावर बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष

Mumbai

संपुर्ण देशभरात ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित करत आहेत.

याप्रसंगी लाल किल्ल्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहेत.

गेल्या आठवड्यात मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले. या निर्णयानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर काल संसदेत भाषण करताना भारताला थेट युद्धाची धमकी दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.