घरदेश-विदेशLok Sabha Exit Poll India: सत्तेच्या चाव्या पुन्हा मोदींकडे?

Lok Sabha Exit Poll India: सत्तेच्या चाव्या पुन्हा मोदींकडे?

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान रविवारी संपले. त्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यात भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला कौल देण्यात आला असून देशात पुन्हा नरेंद्र मोदी सरकार येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सात वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलच्या सरासरीनुसार, भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला ३०४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युपीएला ११७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर पक्षांना १२१ जागा मिळू शकतात. त्यामुळे एक्झिट पोलच्या निकालद्वारे देशात भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार येण्याची शक्यता आहे.

मात्र असे जरी असले तरी या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या मतांमध्ये घट झाल्याचे दिसून येेते. मागील लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३३६ जागा मिळल्या होत्या. एक्झिट पोलचा विचार केला तर यावेळी एनडीएला ३२ जागांचा फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे भाजपच्याही जागा घटण्याची शक्यता असून एक्झिट पोलनुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, अशी शक्यता आहे.

- Advertisement -

टाइम्स नाऊ-व्हीएमआर

एक्झिट पोलमध्ये एनडीएला 542 पैकी 306 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे बहुमताचा 272 हा जादुई आकडा एनडीए सहज पार करेल, असे चिन्ह आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा प्रभाव पाडता आलेला नाही, असे दिसत आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीएला 132 जागांपर्यंतच मजल मारता येईल, असे दिसत आहे. टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलमध्ये अन्य पक्षांना 104 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सी-व्होटर

सी-व्होटरच्या एक्झिट पोलमध्येही एनडीए स्पष्ट बहुमतासह पुन्हा केंद्रात सत्ता स्थापन करेल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 287 जागा मिळतील तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 128 जागा मिळतील, अशी शक्यता असून महागठबंधनला 40 तर अन्य पक्षांना 87 जागा मिळतील, असा अंदाज सी-व्होटरने वर्तविला आहे.

- Advertisement -

एबीपी-नेल्सन

एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज आहे. एनडीला २६७ जागा मिळतील, असा सीव्होटर्सचा अंदाज आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील युपीएला १२७ जागा आणि अन्य पक्षांना १४० जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेडलाईन्स टुडे आणि अ‍ॅक्सिस

या एक्झिट पोलमध्ये हेडलाईन्स टुडे आणि अ‍ॅक्सिसने इतर एक्झिट पोलपेक्षा सर्वाधिक म्हणजे ३३९ जागा एनडीएला मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर युपीएला १०८ आणि इतर पक्षांना ९५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. न्यूज नेशनच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला २९०, युपीएला ११८ तर इतर पक्षांना १३० जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

एक्झिट पोलचे निकाल किती खरे?

एक्झिट पोल हे देशातील जनतेचा कल सांगतात. निवडणुकीचे निकाल येत्या २३ मेला लागणार आहेत. त्यामुळे एक्झिट पोल म्हणजे निवडणूक निकाल नव्हेत. २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलने एनडीएला सरासरी २६० जागा दाखवल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात त्यांना १६९ जागा मिळाल्या. युपीएला सरासरी १८० जागा दाखवल्या होत्या. मात्र त्यांना प्रत्यक्षात २२२ जागा मिळाल्या तर इतरांना सरासरी १०० जागा दाखवल्या असताना त्यांना १३२ जागा मिळाल्या होत्या. २००९ सालच्या निवडणुकीत एक्झिट पोलने एनडीएला सरासरी १८० जागा दाखवल्या होत्या प्रत्यक्षात त्यांना १५९ जागा मिळाल्या. युपीएला २०६ जागा दाखवल्या असताना त्यांना प्रत्यक्षात २६२ जागा मिळाल्या तर इतर पक्षांना सरासरी १४५ जागा दाखवल्या असताना प्रत्यक्षात त्यांना ७९ जागा मिळाल्या. २०१४ सालच्या निवडणुकीत एक्झिट पोलने एनडीएला सरासरी २७० जागा दाखवल्या असताना प्रत्यक्षात त्यांना ३३६ जागा मिळाल्या. युपीएला सरासरी ७८ जागा दाखवल्या असताना त्यांना प्रत्यक्षात ५७ जागा मिळाल्या. तर इतर पक्षांना सरासरी प्रत्यक्षात १३५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे एक्झिट पोल किती खरे होतात हे ज्यांचे त्याने ठरवावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -