संयुक्त राष्ट्रात भारताने पाकिस्तानला सुनावले

राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर भारताविरोधात डॉजिअर सादर सादर करणाऱ्या पाकिस्तानला परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी भारतातर्फे चोख प्रत्युत्तर दिले आहे.

New Delhi
india answers to pakistan on jammu kashmir article 370

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर निराश झालेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर (UNHRC) भारताविरोधात ११५ पानांचं डॉजिअर सादर करत भारतावर खोटे आरोप लावले आहेत. याला परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने जम्मू-काश्मीरचे नुकसान केल्याकडे विजय ठाकूर सिंह यांनीआंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले. तसेच पाकिस्तान दहशतवादाचे प्रमुख केंद्र असल्याचेही भारताने निक्षून सांगितले.

काय म्हणाल्या विजय ठाकूर सिंह?

“पाकिस्तान भारतावर खोटेनाटे आरोप करत असून भारताने काश्मीरबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशीर पाऊल उचलले आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत सांगितले. यामुळे संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला चपराक मिळाली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, “सामाजिक, आर्थिक, समानता आणि न्याय मिळवून देण्यासाठी माझे सरकार धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे विजय ठाकूर सिंह यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, “भारत आपल्या अंदर्गत विषयांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही.”

हेही वाचा – काय म्हणता? ओला-उबर? निर्मला सीतारमण झाल्या तुफान ट्रोल!