घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटतबलिगी जमातच्या अडीच हजार परदेशी नागरिकांना १० वर्ष भारतात बंदी

तबलिगी जमातच्या अडीच हजार परदेशी नागरिकांना १० वर्ष भारतात बंदी

Subscribe

दिल्लीत तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या्या आरोपाखाली केंद्रीय गृहमंत्रालयाने २५५० तबलिगीच्या सदस्यांना काळ्या यादीत टाकले आहे. या सदस्यांवर १० वर्षांसाठी भारतात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मार्च महिन्यात कोरोना महामारीच्या काळात व्हिसा नियमांचे भंग करुन भारतात राहिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

विविध राज्य सरकारांनी मशिदी आणि धार्मिक कार्यक्रमांना तबलिगींची अवैध हजेरीबाबात माहिती गोळा केल्यानंतर केंद्राने ही कारवाई केली आहे. दिल्ली येथील तबलिगी मर्गझच्या कार्यक्रमाला ८ हजाराहून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. यातील अनेकांना नंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. तबलिगींपैकी अनेक परदेशी नागरीक हे पर्यटन व्हिसावर भारतात आले होते. काळ्या यादीत टाकलेल्या नागरिकांवर व्हिसा नियमांचे उल्लंघण आणि साथीचा रोग कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -