SCO Summit 2020 : पाकिस्तानच्या ‘त्या’ काल्पनिक नकाशामुळे भारताचा बैठकीवर बहिष्कार

अजित डोवाल

शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य राष्ट्रांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरीय व्हर्चुअल बैठकी दरम्यान आज, मंगळवारी पाकिस्तानने केलेल्या कृत्यामुळे भारताने या बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे पाकिस्तानच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त करत, यजमान रशियाशी चर्चा करून या बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीत पाकिस्तानच्या प्रतिनिधीकडून त्यांचा ‘काल्पनिक नकाशा’ दर्शवण्यात आला, यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली.

याबाबत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, रशियाकडून आयोजन करण्यात आलेल्या SCO चे सदस्य राष्ट्रांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत पाकिस्तानच्या प्रतिनिधीकडून जाणीवपूर्वक एक काल्पनिक नकाशा दर्शवण्यात आला. जो नकाश पाकिस्तानकडून अशातच सर्वत्र प्रसारित केला जात आहे. पाकिस्तानचे हे कृत्य म्हणजे बैठकीच्या नियमांचे उल्लंघन होते. यामुळे यजमान रशियाच्या प्रतिनिधीशी चर्चा करून भारताने याबाबत विरोध दर्शवत बैठक सोडण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा –

करदात्यांच्या पैशातून Y+ दर्जाची सुरक्षा का? उर्मिला मातोंडकर कंगनावर भडकली