पाकिस्तानमध्ये भारतीय सैनिकांकडून पीन पॉईंट स्ट्राईक? लष्काराने केला खुलासा

air strike in pok
प्रातिनिधिक छायाचित्र

भारतीय सैन्य दलाकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पीन पॉईंट स्ट्राईक झाला असून पीओकेमधील अनेक दहशतवादी तळ उध्वस्त केले असल्याची माहिती मिळत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातम्यानुसार भारतीय सैन्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील काही लाँचपॅड उध्वस्त केले आहेत. हिवाळ्यापुर्वी पाकिस्तानी सेनेला जास्तीत जास्त दहशतवादी भारतीय सीमेच्या आत दाखल करायचे होते. यामुळेच भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राईक करण्याची ही संधी साधली. मात्र हा स्ट्राईक कधी आणि नेमक्या कोणत्या ठिकाणी झाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

भारतीय सेनेने मात्र आज हल्ला झाल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. लवकरच याबाबतची अधिक माहिती भारतीय सेनेकडून जाहीर करण्यात येईल.