भारत-चीन तणावावर आज उच्चस्तरीय लष्करी बैठक

india china military talk complete disengagement of soldiers will be primary issue
भारत-चीन तणावावर आज उच्चस्तरीय लष्करी बैठक

सोमवारी चीनसोबत होणाऱ्या उच्चस्तरीय लष्करी बैठकीच्या सातव्या फेरीत भारत पूर्व लडाखमधील संघर्षाच्या मुद्द्यांवरुन चीनने सैन्य पूर्ण माघार घेण्यावर भर देणार आहे. सरकारच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारताच्या हद्दीतील चुशूलमध्ये मोल्डो बॉर्डर पॉईंटवर बैठक सुरू होईल. या बैठकीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे. तसेच पहिल्यांदाच चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी हजर राहणार आहेत.

पूर्व लडाखमधील सर्व संघर्ष बिंदूवरुन सैन्य मागे घेण्यासाठी एक रुपरेखा तयार करणे, हा या चर्चेचा अजेंडा असल्याचे माहिती समोर आली आहे. चिनी वरिष्ठ मंत्र्यांनी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पूर्ण लडाखमधील परिस्थितीतचा आढावा घेतला आणि आज होणाऱ्या चर्चेत उपस्थित होणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

सीएसजीमध्ये विदेश मंत्री एस जयशंकर, सुरक्षामंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित जोवाल आणि संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत हे ती लष्कर प्रमुख आहेत. पांगोंग तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या अनेक जागांवरुन भारतीय सैन्य मागे घेण्याच्या चीनच्या कोणत्याही मागणीला भारत विरोध करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे दरम्यान भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय लष्करी बैठक सुरू आहेत. आतापर्यंत सहा फेऱ्या पूर्ण झाल्या असून आज सातवी फेरी आहे.


हेही वाचा – सोने खरेदीची सुवर्णसंधी; आजपासून मोदी सरकार विकणार स्वस्तात सोनं!