घरCORONA UPDATEभारताने अधिक कोरोना चाचण्या केल्या; तर रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त असेल -...

भारताने अधिक कोरोना चाचण्या केल्या; तर रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त असेल – ट्रम्प

Subscribe

आतापर्यंत अमेरिकेने २ कोटी कोरोना चाचण्या केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.

भारत आणि चीनने अधिक कोरोना चाचण्या केल्यास त्या देशांमधील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त असेल, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. आतापर्यंत अमेरिकेने २ कोटी कोरोना चाचण्या केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. त्यावेळी त्यांनी इतर देशांमधील कोरोना चाचण्यांची आकडेवारी दिली. याशिवाय जर्मनीने ४० लाख चाचण्या केल्या आहेत. तर सर्वाधिक चर्चा झालेल्या दक्षिण कोरियात करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीस लाखाच्या घरात असल्याचे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेत १ लाख ९ हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू

अमेरिकेतल्या जॉन्स हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत २ लाख ३६ हजार १८४ जणांना, तर चिनमध्ये ८४ हजार १७७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारताने आतापर्यंत ४० लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबद्दलची माहिती दिली आहे.

- Advertisement -

भारत-चीनने चाचण्यांचा संख्या वाढवावी

तुम्ही जितक्या जास्त चाचण्या घेता, तितके जास्त रुग्ण आढळून येतात, असे ट्रम्प यांनी म्हटले. आपण जास्त चाचण्या घेत असल्याने रुग्णांची संख्या देखील जास्त आहे, असं म्हणत असताना ट्रम्प यांनी भारत आणि चीनचा संदर्भ दिला. चीन आणि भारताने देखील चाचण्यांची संख्या वाढविल्यास तिथे अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

जगभरात ४ लाख कोरोना रुग्णांचे मृत्यू

जगातील कोरोना बाधितांची संख्या ६८ लाखांहून जास्त आहे. यात अमेरिकेचे सर्वाधिक रुग्ण आहेत. अमेरिकेतील १९ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ही लक्षणीय आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनामुळे जवळपास ४ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. यातले एक लाखाहून अधिक जण एकट्या अमेरिकेतले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -