घरCORONA UPDATECorona Update: चिंताजनक! देशात सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक नोंद

Corona Update: चिंताजनक! देशात सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक नोंद

Subscribe

देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४६ लाख पार!

जगभरासह देशात कोरोनाचा कहर सुरू असून देशात कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये सलग तिसर्‍या दिवशी सर्वाधिक वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी कोरोना संसर्गाच्या नव्या रुग्ण संख्येने पुन्हा एकदा एका दिवसात सर्व विक्रम मोडले आहे. शनिवारी तब्बल ९७ हजार ५७० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने देशातील कोरोना रुग्णांची संख्या ४६ लाख ५९ हजारांहून अधिक झाली आहे. पण, दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आकडेवारीनुसार आतापर्यंत ३६ लाख २४ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी सकाळी दिलेल्या केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १ हजार २०१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला तर आतापर्यंत ७७ हजार ४७२ जणांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे. दरम्यान, सध्या देशात कोरोना बाधितांचा आकडा ४६ लाखांपार पोहोचला असून बाधितांची संख्या ४६ लाख ५९ हजार ९८५ इतकी झाली आहे. त्यापैकी ९ लाख ५८ हजार ३१८ Active रूग्ण असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.  तर उपचारानंतर ३६ लाख २४ हजारांहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्णांची रिकव्हरी रेट वाढून ७७. ७७ टक्क्यांवर आला आहे तर मृत्यूचे प्रमाण कमी होऊन ते १.६६ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. यासह २०. ५६ टक्के रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृत्यूचे प्रमाणही जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे.


Corona रुग्णांच्या उपचारावर Plasma Therapy प्रभावी नाही – ICMR

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -