घरCORONA UPDATEचिंता वाढली! देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख पार!

चिंता वाढली! देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख पार!

Subscribe

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाख पार गेली आहे. covid19india.org च्या आकडेवारानुसार, देशात आतापर्यंत २० लाख २१ हजार ४०७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यापैकी आतापर्यंत ४१ हजार ६२७ रुग्णांचा मृत्यू झाला असून १३ लाख ७४ हजार ४२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ६ लाख ४ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आता भारत कोरोनाबाधितांच्या संख्येत ब्राझीलच्या मागोमाग आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या २८ लाखांहून अधिक असून ९७ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर कोरोनाबाधितांच्या यादीत अजूनही अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेतील बाधितांची संख्या ४९ लाखांहून अधिक असून यापैकी १ लाख ६१ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत अमेरिका, ब्राझील, भारत, रशिया आणि साउथ आफ्रिका या देशात सर्वाधिक बाधितांची संख्या आहे. जगातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ९० लाख ९३ हजारांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ७ लाख १३ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले असून १ कोटी २२ लाख ५४ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळले आहे. या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाखांहून अधिक आहे. देशात कोरोना सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ७९ हजारांहून अधिक आहे. यामागोमाग तामिळनाडू राज्य असून येथे कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७९ हजारांहून अधिक आहे.


हेही वाचा – Corona Update: चिंताजनक! राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -