घरदेश-विदेशआयात कराच्या मुद्द्यावरून भारताने अमेरिकेला जागतिक व्यापार संघटनेत खेचले

आयात कराच्या मुद्द्यावरून भारताने अमेरिकेला जागतिक व्यापार संघटनेत खेचले

Subscribe

भारतातून अमेरिकेत अॅल्युमिनिअम आणि स्टीलची निर्यात केली जाते. सध्या अमेरिकेने अॅल्युमिनिअम आणि स्टील उत्पादनांवर आयात कर लावला आहे. त्यामुळे या निर्णायाचा भारताने विरोध केला. त्याचबरोबर या आयात कराचा परिणाम अमेरिकेच्या निर्यातीवर होत आहे. त्याचबरोबर जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन अमेरिकेच्या या आयात कराने केले आहे. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेत धाव घेत हा मुद्दा मांडला.

९ मार्चला झाले होते आयात कर लागू
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ९ मार्चला आयात कर लागू केला. हा कर भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या अॅल्युमिनिअम आणि स्टीलच्या उत्पादनांवर लागू करण्यात आला आहे. ९ मार्चला ट्रम्प यांनी दोन विभागांमध्ये हा कर लागू केला. त्यात २५ टक्के आयात कर हा स्टीलच्या उत्पादनांवर तर १० टक्के आयात कर हा अॅल्युमिनियमच्या उत्पादनांवर लावण्यात आला. या उत्पादनांवरील आयात कर रद्द व्हावा, अशी मागणी भारताने केली होती.

- Advertisement -

भारताची जागतिक व्यापार संघटनेत तक्रार दाखल
अमेरिकेने लागू केलेला हा कर जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांमध्ये बसत नाही. त्याचबरोबर भारताच्याही आंतरराष्ट्रीय व्यापारावरती याचा परिणाम होतोय. यामुळे भारताने याविषयी जागतिक व्यापार संघटनेत तक्रार दाखल केली.

चर्चेतून विषय सोडविण्यास भारताचे प्राधान्य
या विषयी अधिकारी म्हणाले की, या विषयी अमेरिकेने एका बैठकीतून विचार विनिमय करुन यावरती तोडगा काढणे अपेक्षित आहे. परंतु, जर या विषयी सकारात्मक निर्णय अमेरिकेने घेतला नाही तर अमेरिकेला जागतिक व्यापार विवाद निवारण समितीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -