घरदेश-विदेशवर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रँकींगमध्ये भारताची घसरण!

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रँकींगमध्ये भारताची घसरण!

Subscribe

मागील वर्षी जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात ५८ व्या स्थानावर असलेल्या भारताची यंदा ६८ क्रमांकावर घसरण झाली आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक अहवालात भारताची घसरण झाली आहे. स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेसाठी करण्यात आलेल्या सुधारणांचे मूल्यांकन करणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालात म्हटले आहे. त्यानुसार मागील वर्षी जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात ५८ व्या स्थानावर असलेल्या भारताची यंदा ६८ क्रमांकावर घसरण झाली आहे.

यंदा जागतिक स्पर्धात्मक निर्देशांकात सिंगापूर प्रथम स्थानी असून दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका, जपान हे देश आहेत. सर्वाधिक आफ्रिकेतील देश या निर्देशांकात सर्वात खाली आहेत. दुसऱ्या देशांच्या चांगल्या प्रदर्शनामुळे भारताच्या रँकींगची घसरण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्देशांकात चीन भारतापेक्षा ४० क्रमांकांनी पुढे आहे. या रँकींगमध्ये चीन २८व्या क्रमांकावर आहे. चीनच्या रँकींगमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

- Advertisement -

कझाकस्तान, व्हिएतनाम सुद्धा भारतापेक्षा पुढे

व्हिएतनाम, कझाकस्तान आणि अझरबैझान सारखे देश सुद्धा या सूचिमध्ये भारताहून पुढे आहेत. ब्रिक्स देशांमध्ये चीन सर्वात पुढे असून ब्राझील भारताहून मागे म्हणजेच ७१व्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरचे हे म्हणणे आहे की, भारतीय अर्थव्यवस्था खूप मोठी असून मोठ्या प्रमाणात स्थिर आहे. पण आर्थिक सुधारणांची गती कमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भारताच्या घसरणीला जबाबदार कोण?

या अहवालात असेही म्हटले आहे की, जगभरात मंदीचे सावट आहे. ज्याच्याशी सामना करणे अर्थव्यवस्थांसाठी मोठे आव्हान ठरेल. या रँकींगमध्ये पाकिस्तान ११०व्या क्रमांकावर असून नेपाळ १०८व्या क्रमांकावर आहे. तर बांग्ला देश १०५व्या क्रमांकावर आहे. भारताच्या रँकींमध्ये झालेल्या घसरणीला आरोग्य व्यवस्था, कामगारांची स्थिती तसेच बँकींग सेवांची स्थिती हे घटक कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -